Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर शहरातून 71 गोवंश जनावरांची सुटका; नंदुरबार पोलिसांची कारवाई

Nandurbar : नवापूर शहरात कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची बेकायदा वाहतूक करीत असताना ७१ गोवंश जनावरांची नंदुरबार पोलिसांनी सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नवापूर शहरात कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची बेकायदा वाहतूक करीत असताना ७१ गोवंश जनावरांची नंदुरबार पोलिसांनी सुटका केली. संबधित १२ जणांवर नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे चार लाख २२ हजार रूपये किंमतीच्या गोवंश जनावरांची सुटका केल्यानंतर गो-शाळेत पाठविण्यात आले. १४ जून रोजी अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नवापूर शहरातील इस्लामपुरा परिसरात गोवंश जनावरे अवैध कत्तल करण्याच्या उद्देशाने व त्यांची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी बांधून ठेवण्यात आली आहेत. ()

माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम निकम, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे, नवापूरचे पोलिस उपनिरीक्षक प्रतिक भिंगारदे यांनी घटनास्थळी जात जनावरे ताब्यात घेतली.

याप्रकरणी संशयित आरोपी हासीम कासीम कुरेशी, जुबेर ऊर्फ बहिऱ्या रेहमान कुरेशी, रऊफ दाऊद कुरेशी, शाहरुख सलीम कुरेशी, अरबाज युसूफ कुरेशी, जाकीर ऊर्फ पट्टो अजीज कुरेशी, समीर अस्लम कुरेशी, फकीरा इब्राहिम कुरेशी, अहमद खान अजिज खान, आबिद दाऊद कुरेशी, इन्नु ऊर्फ इनायत खान दिलेर खान कुरेशी, इरफान खान सईद कुरेशी (सर्व रा. इस्लामपुरा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

SCROLL FOR NEXT