Officers and staff of Forest Department with seized teak wood and furniture. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : सुलवाडे येथे 90 हजारांचे सागवानी लाकूड जप्त; वन विभागाकडून एकाविरोधात गुन्हा दाखल

Nandurbar Crime : सागवानी लाकूड वन विभागाच्या राणीपूर वनक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : सुलवाडे (ता. शहादा) येथे एका राहत्या घरात तयार केलेले सागवानी फर्निचर व सागवानी लाकूड वन विभागाच्या राणीपूर वनक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आले. या संदर्भात वन कायद्यानुसार बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेले सुमारे ९० हजारांचे सागवानी फर्निचर व सागवानी लाकूड वृक्षांची कत्तल करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ( saag wood worth 90 thousand seized in Sulwade by forest department )

सुलवाडे येथे एका व्यक्तीकडे सागवानी झाडांची कत्तल करून फर्निचर तयार करून काही लाकूड दडवून ठेवल्याची गुप्त माहिती सहाय्यक वनसंरक्षक संजयराज साळुंखे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तोरणमाळचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांना या माहितीची चौकशी करून त्या व्यक्तीच्या घरात झाडाझडती करून तपासणी करण्याचे आदेश दिले. या तपासणीत सुलवाडेतील सुरेश मिस्तरी यांच्या राहत्या घरी राणीपूर वनक्षेत्रपाल महेश चव्हाण व त्यांच्या पथकाने सर्च वॉरंट जारी करून तपासणी केली.

त्यात सुरेश मिस्तरी यांच्या घरात अवैधरीत्या व विनापरवाना वाहतूक करून सागवानी लाकडापासून तयार केलेले सोफा सेट, खुर्ची तसेच तीन नग महाराजा पलंग व इतर तयार साइज असलेला सागवानी लाकडाचा मुद्देमाल मिळून आला. वन विभागाकडून सागवानी अवैध मालाचे मोजमाप केले असता एकूण नग संख्या ७४ व आकारमान घनमीटर ०.७९२ एवढे भरले असून, बाजारभावाप्रमाणे ९० हजार रुपये असून, विनापरवाना अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत सुरेश मिस्तरी यांच्याविरोधात राणीपूर वनपाल यांनी वन गुन्हा नोंदविला असून, ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक संजयराज साळुंके यांच्या मार्गदर्शनात तोरणमाळ वनक्षेत्रपाल महेश बी. चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, तोरणमाळ वनपाल एस. एच. पवार, दरा वनपाल रूपाली मोरे, वनपाल मंदाणा प्रियंका बिरारे, वनरक्षक अनिल तावडे, वनरक्षक शहादा नितीन पाटील, गुलाब तडवी, वाहनचालक नईम मिर्झा, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT