News published in 'Sakal'. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact News : कंकाळामाळ परिसरात वीज पुरवठा सुरळीत; ‘सकाळ’च्या वृत्ताची महावितरण कडून 24 तासांत दखल!

Nandurbar News : या बातमीची महावितरणने ताबडतोब दखल घेत २४ तासांत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खापर : अक्कलकुवा तालुक्यातील कंकाळामाळ परिसरात दोन आठवड्यांपासून वीज पुरवठा खंडित असल्याची बातमी ‘सकाळ’च्या माध्यमातून बुधवारी (ता.२६) प्रकाशित झाली होती. या बातमीची महावितरणने ताबडतोब दखल घेत २४ तासांत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. (SAKAL Impact Electricity supply smooth in Kankalamal area)

महावितरणच्या भोंगळ नियोजनाचा त्रास ग्राहकांना होत असल्याच्या अनेक तक्रारी अक्कलकुवा तालुक्याभरात वारंवार होतात. वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचे कर्मचारी तगादा लावतात, थेट दऱ्या-खोऱ्यात पोचतात परंतु दुरुस्तीसाठी तब्बल ३-४ महिने येत नाहीत. आदिवासी भागात राहणाऱ्यावर थेट दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता.

तालुक्याच्या दुर्गम भागातील दऱ्या-खोऱ्यांत वसलेल्या कंकाळामाळ परिसरात दोन आठवड्यांपासून वीजपुरवठा खंडित होता. या परिस्थितीकडे महावितरणाकडून दुर्लक्ष केले जात असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिकांनी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (latest marathi news)

या संदर्भात ‘सकाळ’ने दुर्गम भागातील नागरिकांची समस्या बातमीच्या माध्यमातून मांडली. परिणामी बातमी प्रसिद्धीच्या २४ तासांत या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

"कंकाळामाळ गावातील वीज पुरवठा बुधवार (ता.२६) सुरळीत करण्यात आलेला आहे. वीज वाहिनीला झाडे असल्याने वादळी पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असे. मात्र झाडांच्या फांद्या कापून आणि तार जोडून वीज पुरवठा पूर्ववत केला आहे."

- नरेश कोरचा, सहायक अभियंता-अक्कलकुवा कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT