Agitation
Agitation esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : सफाई कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन स्थगित

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सफाई कामगारांच्या सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्ती, वैद्यकीय अपात्र सेवानिवृत्ती तसेच मृत झाल्यानंतर नामनिर्देशित वारसाने केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ३० दिवसात थेट नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र दोन वर्ष झाले असून, सुद्धा आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन देखील मंगलसिंग वाघ, अजमत सांळुखे, मनोज सूर्यवंशी यांना शासनातर्फे नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाही व त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आले नाही म्हणून लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याकरिता तसेच ,दिरंगाई व प्रलंबित नियुक्ती आदेश निर्गमित होण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आले.

शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व पोलिस कर्मचारी सुरेश मोरे यांनी मध्यस्थी करून थेट जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणली. या चर्चेअंतर्गत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी संघटनेला व उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, येत्या ८ ते १० दिवसात उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. यामुळे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन बरखास्त करण्यात आले. मात्र आठ ते दहा दिवसात नियुक्तीचे आदेश मिळाले नाही व पुन्हा जाणून-बुजून टाळाटाळ करण्यात आली. तर आम्ही पुन्हा बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेश खंडारे, अजमत साळुंखे, मंगलसिंग वाघ, मनोज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT