Chandsaili Ghat in Satpura.
Chandsaili Ghat in Satpura. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Election : सातपुडा परिसराला लोकसभेत प्रतिनिधित्वाची संधी मिळेल?

फुंदीलाल माळी

तळोदा : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसराला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य गेल्या ७५ वर्षांत मिळू शकलेले नाही. सातपुडा परिसरातील इच्छुकांनी निवडणूक जरूर लढविली, मात्र लोकसभेत प्रतिनिधी म्हणून जाण्याचे भाग्य अजून तरी मिळू शकलेले नाही. त्यामुळे यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सातपुडा परिसराला (घाटावरचे) लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मिळते काय, याची उत्सुकता आतापासून सर्वांना लागली आहे. (Nandurbar Lok Sabha Election)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात शहादा-तळोदा, अक्कलकुवा-धडगाव, नंदुरबार, नवापूर तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात अक्कलकुवा-धडगाव, तळोदा-शहादा व शिरपूर मतदारसंघात सातपुडा पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत.

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या जातात. त्यामुळे नंदुरबार मतदारसंघ देशपातळीवर महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवारी करणार, याकडे नेहमीच लक्ष लागलेले असते.

१९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून विचार केला असता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मोजक्याच लोकप्रतिनिधींना मिळाले आहे. त्यात जयवंतराव नटावदकर हे १९५२ च्या निवडणुकीत खासदार झाले; तर १९५७ व १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण वेडू वळवी यांना संधी मिळाली. (latest marathi news)

१९६७ व १९७१ च्या निवडणुकीत तुकाराम हूरजी गावित व १९७७ व १९८० च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांनी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९८१ ते २००९ या कालावधीत तब्बल नऊ वेळा (कै.) माणिकराव गावित यांना टॉप टेन खासदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

२०१४ व २०१९ या दोन निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी बाजी मारली. मात्र, हे सर्व सातपुडा परिसर वगळता आहेत. त्यामुळे सातपुडा परिसरातील नागरिकांना मात्र अजूनही संधी मिळालेली नाही. त्यामुळे ही संधी कोणाच्या रूपाने सातपुडा परिसराला मिळणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित व इंडिया आघाडीचे ॲड. गोवाल पाडवी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तरुण उमेदवारांपैकी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT