लसीकरण मोहीम  sakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : पात्र नागरिकांचे लसीकरण करावे - जिल्हाधिकारी

पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करून घेण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व १८ वर्षांवरील पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करून घेण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.

‘कोविड-१९’ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे (शहादा), जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे आणि गतीने राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन करावे. आरोग्य विभागाला अन्य सर्व विभागांनी आवश्यक ते सहकार्य करावे. शहरी व ग्रामीण भागातील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांच्या अद्ययावत याद्या तयार कराव्यात. गाव, वॉर्डनिहाय सर्वेक्षण करावे. लसीकरण झालेल्या नागरिकांचे डाटा एन्ट्रीचे काम त्वरित पूर्ण करावे. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे परंतु त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नसेल त्याची नोंदणी त्वरित पूर्ण करावी.

लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या तालुक्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यात यावी. दररोज १० ते १५ हजार लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व पात्र सदस्यांचे लसीकरण करावे त्यासाठी जनजागृती करावी. असे त्यांनी सांगितले. नागरिकांना आवाहन ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करावे, लग्न, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत व रस्त्यावर गर्दी टाळावी, वारंवार हात धुवावेत, मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच जिल्ह्यात लसीकरण १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी या वेळी केले.

  • दृष्टिक्षेपात उद्दिष्ट ः १४ लाख २० हजार २००

  • पहिला डोस घेतलेले ः ९ लाख १३ हजार ८३४ (६४.३५ टक्के)

  • दोन्ही डोस घेतलेले ः ४ लाख ६९ हजार ६२७ (३३.०७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT