Watermelon crop available for sale in local farms.
Watermelon crop available for sale in local farms. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कडक उन्हाळा, रमजानमुळे टरबूज खातेय भाव!

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : सध्या ऊन सर्वत्र चांगलेच तापत असून, त्यात रमजान महिनाही सुरू असल्याने पाणीदार फळांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आंबा, पपई, टरबूज, केळी या फळांची मागणी वाढली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आंबा बाजारपेठेत अल्प प्रमाणात दाखल झाल्याने टरबूज, पपई, केळी यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे परिसरात गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी लागवड करण्यात आलेले टरबूज ऐन मोसमात परिपक्व झाल्याने त्याला चांगलीच मागणी आहे. (Nandurbar Watermelon prices increased due to hot summer)

चांगला दरही मिळत असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. तळोदा शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. दरम्यान, यंदा अनियमित हवामानामुळे द्विधा मनःस्थितीत असलेल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी काहीशी उशिरा टरबूज लागवड केली होती.

ते पीक योग्यरीत्या संगोपन, उत्तम हवामान यामुळे जोमाने वाढून चांगली फळधारणा होऊन सध्या बाजारपेठेत दाखल होत आहे. सध्या सर्वांनाच मार्च हीटची झळ बसत असल्याचे चित्र आणि रमजान महिनाही सुरू आहे. (latest marathi news)

यामुळे या पिकाला विशेष मागणी असून, साधारणतः १२ रुपये प्रतिकिलो दराने टरबूज व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत आहे. पपईलादेखील १० ते ११ रुपये दराने मागणी आहे. येत्या काळात हे दर अजून वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टरबूज तोडणी लावण्यासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना गळ घालण्यात येत असून, उन्हाचा तडाखा वाढू लागल्यापासूनच फळांना विशेष मागणी वाढली होती. त्यातच रमजान महिना सुरू असल्याने कडक उन्हातही मुस्लिम बांधवांकडून रमजानचे रोजे करण्यात येत आहेत. दिवसभर उपाशीपोटी दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडून फळांचा आस्वाद घेण्यात येत असल्याने फळांना चांगलीच मागणी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT