Finance Committee Chairman Ganesh Paradke while reading out budget in Zilla Parishad General Assembly.
Finance Committee Chairman Ganesh Paradke while reading out budget in Zilla Parishad General Assembly. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar ZP News : जिल्हा परिषदेचे 54 कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar ZP News : येथील जिल्हा परिषदेच्या २०२३-२०२४ या वर्षाचा सुधारित व २०२४-२०२५ चा मूळ अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (ता. २८) मांडला.

त्यात ५४ कोटी ७२ लाख ९० हजार ४०५ रुपये खर्चाचा व ३० कोटी ८३ लाख १९ हजार ९३३ रुपये शिलकीचा ग्रामीण भागासाठी विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असलेले अंदाजपत्रक सादर केले. (Nandurbar Zilla Parishad budget of 54 crore announced)

त्यात शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान निधी, जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण व अर्थ समिती सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित.

समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, कृषी सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी सभेत २०२३-२०२४ या वर्षाचा सुधारित व २०२४-२०२५ चा मूळ अर्थसंकल्प (अंदाजपत्रक) सादर केले.

स्वउत्पन्नाचा ताळमेळ घालणारे अंदाजपत्रक ः गणेश पराडके

गणेश पराडके म्हणाले, की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह स्वउत्पन्नाचे जमा व खर्चाचे २०२३-२०२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात प्रामुख्याने शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान जसे यानिक उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क इत्यादींचा समावेश तो तो विचारात घेऊन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणारे २०२४-२०२५ चे अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे. (latest marathi news)

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकासोबत पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी यांचेही जमा व खर्चाचे सुधारित व मूळ अंदाजपत्रक सोबत सादर केले आहे. ग्रामीण भागातील समस्या व जिल्हा परिषदेस प्राप्त होणारे मर्यादित उत्पन्न याचा मेळ घालून ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतुदी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विषय समित्यांचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या सूचनांची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उत्पन्न भविष्यात वाढल्यास त्याचा निश्चित समावेश अर्थसंकल्पात करण्यास कटिबद्ध आहोत, असे सांगून सहकार्याबद्दल पदाधिकारी व सदस्यांसह अधिकाऱ्यांसह सर्वांचेच आभार व्यक्त केले.

२०२४-२०२५ चे मूळ अंदाजपत्रक

----------------------------------

तपशील..महसुली.. भांडवली.. एकूण

-----------------------------------------------------------------

आरंभीची शिल्लक - २०,६०,४३,९१३ | ३४,२८,८४,४०२ | ५४,८९,२८,३१५

----------------------------------------------------------------

अंदाजित जमा - १५,०१,८२,०२३ | १५,६५,००,००० | ३०,६६,८२,०२३

----------------------------------------------------------------

एकूण जमा - ३५,६२,२५,९३६ | ४९,९३,८४,४०२ | ८५,५६,१०,३३८

--------------------------------------------------------------------

संभाव्य खर्च - ३५,४७,९०,४०५ | १९,२५,००,००० | ५४,७२,९०,४०५

--------------------------------------------------------------------

अखेरची शिल्लक - १४,३५,५३१ | ३०,६८,८४,४०२ | ३०,८३,१९,९३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT