उत्तर महाराष्ट्र

महामंडळाच्या 67 बस भंगारमध्ये !

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे आयुर्मान नऊ वर्षाचे करण्यात आले असून, जळगाव विभागांतर्गत प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सुमारे 855 बसची व्यवस्था आहे. या सर्वच बसची दुरुस्ती करण्यात आले असून, आयुर्मान संपलेल्या विभागातील 67 बस भंगारमध्ये काढण्यात आल्या आहेत. आणि नव्या बांधणीच्या 25 बस दाखल झाल्या असल्याने प्रवाशांना चांगला आरामदायी प्रवास करता येत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे. 

खडतर मार्गांवरून धावणाऱ्या "एसटी'चा प्रवाशांना मोठा आधार होता. आता खासगी प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाला स्पर्धा निर्माण झाल्याने यात टिकून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा करण्यासाठी "एसटी' देखील तत्पर झाली. यामुळेच जुन्या बांधणीतील बस आता कालबाह्य होऊ लागल्या असून, स्पर्धेशी सामना करीत परिवहन सेवा चालू ठेवण्यासाठी बसच्या रंगाची शेड बदलून त्यांना नवा लुक देणे, जुन्या बस बदलून नव्या बस आणत असताना "टू बाय टू' परिवर्तन बस आल्या. आता तर परिपूर्ण लक्‍झरी असलेली शिवशाही आली. तसेच लालपरी म्हणून ओळखली जाणारी एम.एस. बॉडी (स्टील बॉडी) सेमी लक्‍झरी बस महामंडळात दाखल झाली आहे. जळगाव विभागात नवीन बस दाखल होत असताना आयुर्मान संपलेल्या 67 बस भंगारमध्ये काढण्यात आल्या आहेत. पण अन्य बसची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 
..... 
एम.एस. बॉडीच्या 25 बस 
परिवहन महामंडळाने बस बांधणीत मोठा बदल केला आहे. सुरवातीला साध्या लालपरी बस ऐवजी "टू बाय टू'च्या परिवर्तन बस आल्या होत्या. परंतु, यात झपाट्याने बदल करत आरामदायी शिवशाही आल्या आणि त्या पाठोपाठ साधी लालपरी म्हणून नव्या बांधणीतील स्टील बॉडीची पांढऱ्या रंगातील बस तयार करण्यात आल्या. या एम.एस. बॉडीच्या 25 बस जळगाव विभागात दाखल झाल्या असून, या बस भुसावळ- धुळे, चोपडा- जळगाव, धरणगाव, शिरपूर- पाचोरा, रावेर- जळगाव, अमळनेर- धुळे या मार्गावर जलद म्हणून धावत आहेत. 

सर्व बसला फलक अनिवार्य 
बसस्थानकातून बस मार्गस्थ करताना चालकांकडून बसच्या काचेवर चुन्याने गावाचे नाव टाकले जात असायचे. यामुळे प्रवाशांना नाव ठिकसे वाचता येत नव्हते. तर काही चालक लाल रंगाच्या अक्षरातील पाटी लावून थांब्यांवर गाडी न थांबविताच बस नेत होते. याकरिता विभागात 2500 नवीन प्लॅस्टिकचे बोर्ड तयार करण्यात आले असून बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, ही बस सर्व थांब्यांवर थांबविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना

Gokul Milk Union History : ‘गोकुळ’ची स्थापना कधी झाली? आतापर्यंत किती अध्यक्ष झाले; पहिल्यांदाच चंदगडला अध्यक्षपदाचा मान, पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : कोलकाता-मुंबई एअर इंडिया विमानात हायजॅकची धमकी देणारी चिठ्ठी सापडली; विमान 'आयसोलेशन बे'मध्ये हलवले

Sakal Global Lit Fest: सकाळ ग्लोबल लिट फेस्टमध्ये Emotional Healthवर विशेष चर्चा; 14 नोव्हेंबरला पुण्यात परिसंवाद

Pune FDA Action: पुण्यात FDA ची कारवाई; दोन दुकांनाचे परवाने रद्द; 93 किलो मिठाई जप्त करून नष्ट

SCROLL FOR NEXT