उत्तर महाराष्ट्र

‘नर्मदे’नं बांधला साक्षरतेचा बांध!

सचिन पाटील

शिरपूर - मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा प्रवास, माहेर- सासरची प्रतिकूल परिस्थिती आणि नोकरीनंतरही समोर उभी असलेली आव्हाने, अशा खडतर परिस्थितीत बळ दिले ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनी... पायपीट करीत घेतलेले शिक्षण आणि त्याआधारे मिळालेली नोकरीची संधी यातून कुटुंब, सामाजिक स्थिती सावरण्याची सतत धडपड, असा अंगणवाडीसेविका नर्मदाबाई महादेव फुलमाळींचा प्रवास आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ’शी बोलताना कष्टप्रद आयुष्याचा पट उलगडला. 

नर्मदाबाई फुलमाळी येथील बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत चांदसूर्या येथे कार्यरत आहेत. त्यांचे माहेर वरला (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील आहे. तेथील शाळेत त्या आठवीपर्यंत शिकल्या. त्यांना ३५ वर्षांपूर्वी बालविकास प्रकल्पांतर्गत सेवेची संधी मिळाली. आवश्‍यकतेनुसार त्यांनी ११ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बोराडी (ता. शिरपूर) येथील गुलाब तिरमले हे त्यांचे पती. तिरमले कुटुंब मोलमजुरी करून पोट भरत होते. त्या कुटुंबात नर्मदाबाई या पहिल्याच नोकरदार ठरल्या. त्यांना जुना चांदसूर्या गाव कार्यक्षेत्रासाठी मिळाले. रोज बोराडी ते चांदसूर्या, अशी पायपीट करून नंतर कामासाठी पायी फिरणे भाग पडत असे. त्यामुळे तिरमले कुटुंब चांदसूर्या गावीच स्थायिक झाले. मात्र नर्मदाबाईंची पायपीट काही थांबली नाही.

परिसरातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये लसीकरण, औषधी पोहचवणे आदी शासकीय आरोग्य मोहिमांसाठी त्यांना दिवसाकाठी ३० किलोमीटर पायी फिरणे भाग पडत होते. डोक्‍यावर औषधी व अन्य साहित्याचा भार असे. मात्र त्यांनी अखंड सेवा दिली. कामाला कधीही सुटी न देता इमानेइतबारे कर्तव्य करून नावलौकिक कमावला. 

नर्मदाबाईंची ही वाटचाल सहजसाध्य नव्हती. लसीकरण, नसबंदी आदींसाठी खूपदा मिनतवाऱ्या कराव्या लागायच्या. आदिवासी भागात शासकीय औषध घेतले तर अपंगत्व येते, अशी ठोस अंधश्रद्धा रूढ होती. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थ वाद घालत. उद्दिष्टपूर्ती करताना ऊन, पाऊस यांचा त्रास हमखास होत असे. प्रवासासाठी वाहने उपलब्ध नव्हती. अशा खडतर परिस्थितीतही नर्मदाबाईंनी धीर सोडला नाही. आपले काम नेटाने सुरू ठेवले. अंगणवाडी सेविका म्हणून काम करताना नियमित कर्तव्यासोबत मुलामुलींना शाळेत, अंगणवाडीत पाठवण्याबाबत त्या आग्रही असतात. त्यांच्या अथक प्रयत्नातून शिक्षणाचे महत्त्व हळूहळू लक्षात येऊ लागल्याने पालकांचेही संभ्रम फिटले हे विशेष. 

अंगणवाडीवाली बाई... 
संघर्षरत नर्मदाबाईंची शिरपूर तालुक्‍यात अंगणवाडीवाली बाई, अशी ओळख रूढ झाली. आज या परिसरात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. सावित्रीच्या या लेकीने ३५ वर्षांपासून केलेली सेवा आज नावारूपाला आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT