Dr. shobhatai Bachhav dr. shubhash bhamre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : मविआ- महायुतीत अजूनही मालेगावात रुसवेफुगवे सुरूच

Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरणारे असतात.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरणारे असतात. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. मात्र, युती व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांत अजूनही मोठ्या प्रमाणात रुसवेफुगवे आहेत. Malviya Mahayuti continues to tussle in Malegaon )

डॉ. भामरे यांच्या प्रचारात शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झालेली नाही; तर दुसरीकडे डॉ. बच्छाव यांच्या प्रचाराकडे काँग्रेसच्याच काही नेत्यांनी पाठ फिरवली आहे. धुळे लोकसभेची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली. खासदार डॉ. भामरे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. जवळपास महिनाभर हे नाराजीनाट्य सुरू होते.

भेटीगाठी घेत डॉ. भामरे यांनी इच्छुकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शहरात तसेच ग्रामीण भागात मेळावे झाले. या मेळाव्यात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या एका नेत्याच्या समर्थकांनी दांडी मारली. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला असला, तरी शिवसेना (शिंदे गट) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेली नाही. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. (Nashik Political News)

भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचा संयुक्त मेळावा झाल्यावरच प्रचाराला दिशा मिळू शकेल. महाविकास आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत रणकल्लोळ माजला. पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांनी राजीनामा दिल्यावर पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण झाला.

श्री. सनेर यांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. डॉ. बच्छाव यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष पदाधिकाऱ्यांचा शहरात मेळावा घेतला. या मेळाव्याकडे डॉ. शेवाळे व त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात अद्याप मेळावा झालेला नाही. डॉ. शेवाळे समर्थकांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. ते डॉ. बच्छाव यांच्या प्रचारात सक्रिय होतात की अन्य पर्याय निवडतात, याबाबत उत्सुकता आहे.

हिरे समर्थकांकडे लक्ष

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते अद्वय हिरे यांची ताकद आहे. जिल्हा बँक कर्ज प्रकरणी खटल्यात श्री. हिरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचे समर्थक अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. हिरे समर्थकांकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

Latest Marathi News Live Update : 'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

योगिता सौरभपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा संसार मोडणार? नवऱ्यापासून राहतेय वेगळी; एकमेकांना अनफॉलोही केलं...

Dhule News : दिवाळीनंतर एसटीचा 'सुपरफास्ट' विक्रम! धुळे विभागातून पुणे-मुंबईसाठी एकाच दिवसात १०९ जादा बस रवाना

SCROLL FOR NEXT