dryspell 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील ‘ड्रायस्पेल’ चिंताजनक

संतोष सूर्यवंशी

नाशिक - नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाळ्यातील ड्रायस्पेल म्हणजेच कोरड्या दिवसांच्या संख्येत वाढ होत आहे. दर वर्षी ऐन पावसाळ्यात कोरडे दिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्‍त होत आहे. २०११ ते २०१८ पर्यंत पावसाळ्यातील कोरड्या दिवसांचा आढावा घेतल्यास यात २०११ च्या जून ते ऑक्‍टोबर अशा पाच महिन्यांत सर्वाधिक कमी कोरडे दिवस नोंदविण्यात आले होते. त्यांची संख्या ३१ होती. २०१५ च्या जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत सर्वाधिक जास्त कोरडे दिवस नोंदविण्यात आले. त्याची संख्या तब्बल ९२ होती.

जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळ्याचे असतात. ढोबळमानाने कुठलेही अडथळे न राहिल्यास साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मॉन्सून धडकून संपूर्ण राज्यात सक्रिय होत असतो; परंतु गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता राज्यभरात दमदार पावसाला जुलै उजाडत असल्याचे दिसून येते. जुलै, ऑगस्ट महिना हा तीव्र पावसाचा असतो. पण काही वर्षांपासून जुलै, ऑगस्टमध्येही कोरड्या दिवसांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारी सांगते. 

सन २०११ मध्ये जून ते ऑक्‍टोबर ३१ कोरडे दिवस नोंदविले गेले आहेत. ८ दिवस सप्टेंबर, २३ दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदले गेले आहेत. २०१२ मध्ये ३६ कोरडे दिवस नोंदवले. यातील ८ दिवस जूनमध्ये, ८ दिवस सप्टेंबरमध्ये, तर २० कोरडे दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदले गेले. २०१३ मध्येही ३६ कोरडे दिवस होते. यात १४ दिवस ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये, ७ दिवस सप्टेंबर व ऑक्‍टोबर, तर १५ दिवस ऑक्‍टोबरमध्ये नोंदवले गेले. २०१४ मध्ये ७२ कोरडे दिवस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT