उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये २३०० किमी जलवाहिनीचे जाळे

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महापालिकेतर्फे पाणीगळतीचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून शहरात दोन हजार ३०० किलोमीटरची पाण्याची जलवाहिनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून जलवाहिनीची माहिती समोर आली आहे. बहुतांश जलवाहिन्या जुन्या असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्या काढून घेण्यापेक्षा आहे, त्याच जागेवर ठेवण्यात आल्याने जलवाहिन्यांचा आकार मोठा दिसत आहे. पण प्रत्यक्षात सुमारे दोन हजार किलोमीटर जलवाहिनीचाच उपयोग होत असल्याचा अंदाज आहे.

महापालिकेतर्फे ऑक्‍टोबर २०१५ मध्ये पाण्याचे सर्वेक्षण करण्याचे काम एनजेएस इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले होते. पाण्याचा हिशेब तपासण्याबरोबरच पाण्याचा वापर कमी करणे, देखभाल- दुरुस्तीचा खर्च कमी करणे, गळती कमी करण्यासाठी उपाय सुचविणे आदी उपाय या संस्थेला देण्यास सांगण्यात आले होते. नुकतेच कंपनीतर्फे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यात शहरात सरासरी चाळीस टक्के पाणीगळती असल्याचे समोर आले आहे. त्याव्यतिरिक्त जीआयएस मॅपिंगद्वारे राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेतून शहरात दोन हजार ३०० किलोमीटरची जलवाहिनी असल्याचे दिसून आले. 
जमिनीखाली असलेल्या जलवाहिन्यांपैकी सुमारे दोन हजार जलवाहिन्यांचा प्रत्यक्षात वापर होत असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी शहरात अठराशे किलोमीटरची जलवाहिनी असल्याचे सांगितले जात होते. पण जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून अतिरिक्त जलवाहिनी जमिनीखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

झटपट दुरुस्तीसह वाहिनीचा हिशेब ठेवण्यात मदत
नाशिक, सातपूर व नाशिक रोड पालिका मिळून महापालिकेची स्थापना झाली. त्यामुळे तिन्ही पालिकांच्या काळात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांचा हिशेब नव्हता. जलवाहिनी ज्या भागातून गेली आहे. त्या भागासाठी पूर्वी काम करणाऱ्या व्हॉल्व्हमनचीच मदत घ्यावी लागत होती.

महापालिकेच्या स्थापनेनंतर शहराचा विस्तार झपाट्याने झाला. जशी नगरे वाढत होती, त्याप्रमाणे जलवाहिनी टाकण्याचे काम झाले. जेथे वस्ती वाढली, तेथे वाहिनीचा व्यास वाढविण्यात आला. त्यामुळे पूर्वीच्या वाहिनीचा वापर न करता जमिनीतच गाडले गेले. पाणीपुरवठा विभागाकडे वीस किंवा चाळीस फुटांची वाहिनी टाकण्याचे काम झाले. त्यामुळे वाहिनीच्या संख्येवरून शहरात त्या किती आहेत? याचा अंदाज लावला गेला. आता ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टिमनुसार तपासणी झाल्याने त्यांचे काटेकोर हिशेब ठेवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT