उत्तर महाराष्ट्र

नाशिकवरून २३ ला झेपावणार एअर डेक्कन

सकाळवृत्तसेवा

नाशिक - अनेक वर्षांपासून नाशिककरांनी स्वप्न पाहिलेल्या बहुचर्चित विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनी मुंबई- नाशिक, नाशिक- पुणे व मुंबई-जळगाव अशी २३ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करणार आहे. कंपनीने विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.  

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नाशिकमधून सप्टेंबरपासून हवाईसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळावर स्लॉट न दिल्याने या सेवेला विलंब झाला. ही बाब केंद्रीय हवाई मंत्रालयाच्या 

निदर्शनास आणून दिल्यानंतर उडान योजनेत पुन्हा नाशिकचा समावेश करण्यात आला. विमानसेवा सुरू न झाल्याने या सेवेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; परंतु एअर डेक्कन या कंपनीला दक्षिण आफ्रिकेतून १९ सीटरचे विमान खरेदी करण्याची परवानगी मिळाली. हे विमान राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर आज एअर डेक्कन कंपनीने हवाईसेवेसाठी तारीख व वेळापत्रक जाहीर केले. कंपनीच्या वेबसाइटवर तातडीने उद्यापासून बुकिंगही सुरू केले जाणार आहे. १४२० रुपये प्रतिसीट असा नाशिक- मुंबई सेवेचा तिकीटदर निश्‍चित करण्यात आला. प्रवाशांसाठी कंपनीतर्फे भाग्यवान योजनाही सुरू करण्यात आली. त्यात भाग्यवान प्रवाशांना एक रुपयात प्रवास करण्याची संधी मिळेल. १९ सीटरचे हे विमान मुंबई- नाशिक, नाशिक- पुणे व मुंबई- जळगाव अशा फेऱ्या मारेल. 

विमानसेवेचे वेळापत्रक
एअर डेक्कन कंपनीचे विमान दर सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी नाशिक (ओझर) विमानतळावरून मुंबईकडे (फ्लाइट नंबर डीएन १९१) उड्डाण घेईल. हे विमान सकाळी सात वाजून १० मिनिटांनी सांताक्रूझ विमानतळावर पोचेल. मुंबई येथून (डीएन १९२) सायंकाळी पाच वाजून १० मिनिटांनी विमान नाशिककडे उड्डाण घेईल आणि ते ओझर विमानतळावर सायंकाळी सहाला पोचेल. मुंबई येथून जळगावसाठी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी विमान (डीएन १८१) उड्डाण घेईल आणि नऊ वाजून दहा मिनिटांनी ते जळगावला पोचेल. जळगाव येथून तेच विमान (डीएन १८२) सकाळी सव्वाअकराला उड्डाण करेल आणि दुपारी पाउणला मुंबईत पोचेल. नाशिकहून (ओझर) (डीएन १९३) सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पुण्याकडे विमान झेपावेल आणि ते सायंकाळी सातला लोहगाव विमानतळावर पोचेल. पुणे येथून सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी (डीएन १९४) विमान उड्डाण करेल आणि रात्री आठला ओझर विमानतळावर पोचेल. जळगाव येथून मुंबईसाठी दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल आणि दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईला पोचेल. एअर डेक्कन कंपनीने २३ डिसेंबर ते २४ मार्चपर्यंत हे वेळापत्रक जाहीर केले आहे. एअर डेक्कन कंपनीच्या वतीने नाशिकनंतर कोल्हापूर व सोलापूरसाठी मुंबईहून विमाने सोडली जाणार आहेत.

खऱ्या अर्थाने स्वप्न साकारले - गोपीनाथ 
नवी दिल्ली - अतिशय कमी पैशात भारतीयांना हवाईसफर करता यावी, असे स्वप्न घेऊन २००३ मध्ये कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी एअर डेक्कनची स्थापना केली. नऊ वर्षांच्या सेवेनंतर एअर डेक्कन उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये विलीन झाले. नंतर २०१२ मध्ये मल्ल्या यांच्याशी फारकत घेऊन गोपीनाथ यांनी पुन्हा पहिल्याच नावाने एअर डेक्कनने हवाईसेवेत पुनरागमन केले. नाशिक- मुंबई, नाशिक- पुणे, जळगाव- मुंबई विमानसेवा २३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्यामुळे माझे खऱ्या अर्थाने लहान शहरांतून विमानसेवा सुरू करण्याचे स्वप्न साकारले, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT