उत्तर महाराष्ट्र

'आशा कर्मचाऱ्यांचा गौरव ही समाजाची गरज'

सकाळवृत्तसेवा

नाशिक - आशा स्वयंसेविका घराघरांत पोचल्या आहेत. रुग्णांपर्यंत पोचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. या मुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे ही समाजाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे आज वितरण झाले. त्या वेळी सौ. सांगळे बोलत होत्या. आरोग्य सभापती यतिंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, सारिका नेहते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, शोभा खैरनार, डॉ. दावल साळवे आदी उपस्थित होते. 

आरोग्य सभापती यतिंद्र पाटील म्हणाले, आरोग्य विभागात आशा कर्मचारी अष्टपैलूने काम करतात, ते चांगले आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्वयंसेविका, तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय, डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र, उपकेंद्र पुरस्कार व उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेश निकम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. साळवे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी आसावरी केदारे, वैशाली शिंदे, प्रशांत केळकर, भय्या आहिरराव यांनी सहकार्य केले. 

यांचा झाला सन्मान 
ग्रामीण रुग्णालय पुरस्कार - नांदगाव ग्रामीण रुग्णालय. 
डॉ. आनंदीबाई जोशी प्राथमिक आरोग्य केंद्र - करंजगव्हाण (प्रथम), काळुस्ते (द्वितीय) लोहोणेर (तृतीय). 
डॉ. आनंदीबाई जोशी उपकेंद्र : बोरटेंभे (प्रथम), गुंजाळनगर (द्वितीय), पिंपळद (तृतीय). 

जिल्हास्तरीय स्वयंसेविका - वैशाली सोनवणे, नासिम यज्जाद शेख. 

तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका - सुरेखा खैरनार, शैला नेरकर, वनिता खैरनार, रोहिणी शिरसाठ, रंजना गांगोडे व कविता रायकर, छाया सोनजे, संगीता आहेर, कल्पना नाठे, जयश्री गोडसे, अनित निकम, सुनीता शिंदे, सुनीता गरूड, वंदना सोनवणे, सुरेखा जगताप, सुंदराबाई कुमावत, सुषमा सदावर्ते, कविता टोंगारे, बेवी वाघ व विमल दिवे, सीता जाधव, अनिता गायकवाड, लता तुपे व नलिनी सानप, सुवर्णा सकाळे व राधा बदादे, भीमा खांडवी व वत्सला महाले, सिंधू थोरात, कविता वाघ. 

प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार - कविता राजगुरू, ज्योती सावंत, कविता पाटोळे. 

नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार : सानिका बच्छाव, योगिता चव्हाण. 

आशा गट प्रवर्तक पुरस्कार : सुनंदा परदेशी, जोत्स्ना शेवाळे, आशा शेळके. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT