उत्तर महाराष्ट्र

व्यापाऱ्यांचे "उकळ पांढरं' अन्‌ शेतकऱ्यांना दणका

सकाळवृत्तसेवा

नाशिक - कांद्याचे आगार असलेल्या जिल्ह्यात कांद्याचे भाव कोसळल्याने व्यापाऱ्यांचे उकळ पांढरे होणार असून शेतकऱ्यांना दणका बसला आहे. दिल्लीकरांसाठी "नाफेड'तर्फे, तर तमिळनाडू सरकारतर्फे चेन्नईकरांसाठी लासलगावमधून कांदा खरेदी केला जात होता. ही खरेदी थांबवण्यात आली आहे. कांदा निर्यातमूल्य दर वाढवल्याने एक प्रकारची निर्यातबंदी लागू होताच, चोवीस तासांमध्ये भाव कोसळले आहेत.

जळगावमध्ये काल (ता. 23) सरासरी 2,450 रुपये क्विंटल या भावाने कांद्याची खरेदी झाली. आज 2, 371 रुपये भाव मिळाला.

लासलगावमध्ये 3, 511, तर पिंपळगावमध्ये 3, 705, मालेगावमध्ये 3, 851 रुपये क्विंटल या भावाने काल कांद्याची विक्री झाली होती. आज लासलगावमध्ये 3, 150, पिंपळगावमध्ये 3, 510, मालेगावमध्ये 3, 750 रुपये या भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे. हा अपवाद वगळता 24 तासांमध्ये देशातंर्गत बाजारपेठेमधील भावात वृद्धी झाली आहे.

कांद्याचे भाव कोसळल्याची बाजारात अफवा पसरली आहे. देशातंर्गत बाजारपेठेचा विचार करता, कुठेही भाव घसरलेले नाहीत. शेतकऱ्यांनी सरकारच्या राजकीयदृष्ट्या धोरणांमुळे गोंधळून जाऊ नये. देशातील बाजारपेठेचा कानोसा घेऊन मगच कांदा विक्रीचे धोरण स्वीकारणे आवश्‍यक आहे.
- चांगदेवराव होळकर (माजी अध्यक्ष, नाफेड)

देशातंर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भाव (क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
बाजारपेठ काल (ता. 23) आज

अलुवर 3, 062 3, 250
बेंगळुरु 3, 700 3, 700
भुवनेश्‍वर 4, 350 4, 500
चेन्नई 4, 200 4, 500
दिल्ली 2, 613 2, 690
जयपूर 2, 650 2, 800
महुआ 3, 000 3, 250
मुंबई 3, 800 3, 800
पुणे 2, 600 3, 500
सुरत 3, 625 3, 625
कोलकता 4, 875 5, 125

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT