उत्तर महाराष्ट्र

विसाव्या शतकातील सशक्त महिलेची अनोखी कहाणी

नरेंद्र जोशी

नाशिक - माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची रात्री दोनला व नंतर सकाळी सातला नाशिकमध्ये झालेली जंगी सभा व त्यासाठी 80 च्या दशकात लाखोंची गर्दी आजही नाशिककरांच्या स्मृतिपटलावर कायम आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभांना एवढी मोठी गर्दी त्यानंतर क्वचितच दिसली. 

(स्व.) इंदिरा गांधी या दोनदा नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. पहिल्यांदा 1979 मध्ये जेव्हा आल्या त्या वेळी जनता पक्षाचे सरकार देशात सत्तेवर होते. सर्वत्र समाजवाद्यांचे वर्चस्व होते. श्रीमती गांधी यांची धुळ्याला सभा होती. नाशिकच्या सभेचे नियोजन नसलेली ही सभा अचानक झाली. धुळे येथील प्रचारानंतर नाशिकला एक सभा होऊ शकते, असे ऐनवेळी पुढे आल्याने ही सभा झाली. त्यानंतर सायंकाळी गोल्फ क्‍लब मैदानावर सभा होती. त्या वेळी म्हणजे 80 च्या दशकात दोन ते अडीच लाख नागरिक जमल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. गोल्फ क्‍लब तेव्हा आजच्यासारखे बंदिस्त नव्हते. नाव मैदान असले, तरी एक प्रकारचे मोकळे रानच होते. अशा ठिकाणी मध्यरात्री दोनला श्रीमती गांधी यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे व कमला अजमेरा आदी नेते होते. 

संरक्षणासाठी उशी, भटारखाना बंद  
देशात त्या वेळी जनता पक्षाची सत्ता असल्याने विरोधी पक्षातील माजी पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या अनेक आठवणी आहेत. मध्यरात्री दोनला सभा सुरू झाली. एवढ्या मध्यरात्री खच्चून गर्दी आणि शांतता असूनही गडबड किंवा दगडफेकीसारखे कुठलेही अनुचित प्रकार उद्‌भवू नयेत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना इजा होऊ नये यासाठी "स्टेज'वर उशीची सोय होती. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते एन.के.पी. साळवे स्वतः श्रीमती गांधी यांच्या पाठीमागे उशी घेऊन उभे होते. माजी पंतप्रधानांची सभा असूनही साधा पोलिस बंदोबस्त होता. त्यात कुठला विशेष लवाजमा नव्हता. पहाटे तीनला त्यांची सभा संपल्यानंतरच नागरिक शांततेत घरी गेले. भोजनासाठी शासकीय विश्रामगृहात भटारखानाही बंद होता. त्यामुळे विश्रामगृहावरील कर्मचाऱ्यांनी भोजनाची सोय केली. विशेष म्हणजे, ती शिदोरी श्रीमती गांधी यांनी आवडीने खाऊन सकाळी त्या दिल्लीला रवाना झाल्या. 

दीड वर्षातच दुसरी सभा 
1980 च्यादरम्यान विधानसभा निवडणूक प्रचारासाठी श्रीमती गांधी पुन्हा नाशिकला आल्या. कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार जयप्रकाश छाजेड होते. ही सभा चक्क सकाळी सातला झाली होती. त्याहीवेळी एक लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. बळिराम हिरे, गोपाळराव गुळवे, मुरलीधरअण्णा लोणारी, मुरलीधर माने, ललित समनोत्रा, हरिभाऊ गवळी, उमाकांत गवळी आदींनी सभेसाठी परिश्रम घेतले होते. तीही सभा चांगलीच गाजली होती. सभेसाठी माणसे टेम्पोत भरून आणण्याची पद्धत त्या काळी नव्हती. स्वतःहून ते येत होते. त्यानंतर कधीही एवढ्या मोठ्या संख्येने स्वतःहून नागरिक सभेला आलेले दिसले नाहीत, असे माजी आमदार छाजेड यांनी स्पष्ट केले. सभेनंतर नाशिकमधील पत्रकारांशी श्रीमती गांधी यांनी संवाद साधला. त्यांच्याबरोबर छायाचित्रही काढले होते. जन्मशताब्दीनिमित्ताने या सर्व आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 

सभेचे सर्वांनाच अप्रूप 
माजी पंतप्रधानांच्या संरक्षणाला स्टेजवर उशी 
टीव्ही नसल्याने पंतप्रधानांना पाहण्याचे अप्रूप 
इंदिरा गांधी यांना पाहण्यासाठी दूरवरून गर्दी 
ऐकण्याच्या कुतूहलापोटी अनेकांचे जागरण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT