खामखेडा जिल्हा नाशिक येथे कांदा पिकं परिसंवादात मार्गदर्शन करतांना प्रा महेंद्र पवार व मान्यवर
खामखेडा जिल्हा नाशिक येथे कांदा पिकं परिसंवादात मार्गदर्शन करतांना प्रा महेंद्र पवार व मान्यवर  
उत्तर महाराष्ट्र

खामखेडा येथे शेतकऱ्यांसाठी कांदा पिकं परिसंवादाचे आयोजन

खंडू मोरे

खामखेडा (नाशिक): ऍग्रोवन व महाधन यांच्या संयुक्त विद्यामाने खामखेडा (ता. देवळा) येथे दर्जेदार कांदा पिकं नियोजनांसाठी शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच संतोष मोरे यांनी केले. केव्हीके वडेल (ता. मालेगाव) कार्यक्रम सहाय्यक प्रा. महेंद्र पवार, खामखेडयाचे उपसरपंच बापू शेवाळे, खामखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनिल शेवाळे, दिपक फर्टीलायझर नाशिकचे एरिया मनेजर विकास खैरनार, स्वप्निल घोरपडे, कैलास जाधव आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रा. महेंद्र पवार यांनी शेती समोरील संकटे, कसमादे परिसरातील प्रमुख पिके यांची ओळख देतांना कांद्याचे राज्याच्या उत्पादनातील जिल्ह्याचे स्थान, कांदा उत्पन्नातील टप्पे बियाणे निवड करतांना खरीप व रब्बी हंगामातील बियाण्यांची निवड, बिजोत्पादनावेळी घ्यावयाची काळजी, रोपवाटिका व्यवस्थापनात व रोपांची लागवड, खत व्यवस्थापन, रासायनिक खतांचा वापर यासंदर्भात शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

गारपिटीमुळे कसमादे भागातील शेतीत दुय्यम व शुश्म अन्न द्रव्यांची कमतरता दाखवत आहेत. त्यामुळे शेणखताची मात्र वाढवत जमिनीचा पोत सुधारावा यासाठी खतांची पिकासाठीची मात्रा, कांदा लागवड, पिकावर करण्यात येणाऱ्या फवारण्या, पिकं संरक्षण करतांना रोग व किडी प्रादुर्भाव, वातावरणाने पिकावर येणारे रोग, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, पाणी व्यवस्थापन, कांदा काढणी पश्च्यात साठवणूक व्यवस्थापन यासंदर्भात प्रा पवार यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य कार्ड, कांदा पिकं संवर्धन व लागवड यासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक व सखोल असे उत्तरे दिले.

दिपक फर्टीलायझर नाशिकचे एरिया मनेजर विकास खैरनार यांनी शेतकऱ्यांनां फळ ,भाजीपाला व विशेषता कांदा पिकासाठी स्टेज नुसार वापरले जाणारे खाद्य,माती परीक्षणाचे महत्व, माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन व अन्न द्रव्यांचा संतुलित वापरा संदर्भात तशेच महाधन ह्या अप्लिकेशनच्या माध्यमातुन कांदा व इतर पिकांची लागवडीपासुन तर काढणी पर्यंतची व वापरा संदर्भातील माहिती उपस्थित शेतकर्‍यांना पटवून दिली.

यावेळी दादाजी बोरसे, नानाजी मोरे, नामदेव बच्छाव, संजय मोरे, गोकुळ मोरे, सुधाकर शिरोरे, प्रभाकर शेवाळे, नारायण शेवाळे, बाळू मोरे, विजय शेवाळे, भाऊसाहेब बोरसे, यांसह सावकी, लोह्नेर, लखमापूर सह कसमादे भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 'सकाळ'चे बातमीदार खंडू मोरे यांनी सुत्रसंचालन केले. ऍग्रोवनचे प्रतिनिधी सुनिल रौंदळ यांनी आभार मानले.

फोटो ओळ-खामखेडा जिल्हा नाशिक येथे कांदा पिकं परिसंवादात मार्गदर्शन करतांना प्रा महेंद्र पवार व मान्यवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT