उत्तर महाराष्ट्र

बहीण-भावाच्या वादात दोन उपनिरीक्षकांचे निलंबन 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - खुनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणी तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल सरकारवाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांना निलंबित करण्यात आले. नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या तक्रारीची दखल घेत, पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ मोरे आणि सुमेध सोनोने अशी त्यांची नावे असून, बहीण-भावाच्या वादात संशयास्पद भूमिका बजावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. 

राजश्री प्रताप शिंदे (रा. सिडको) व नितीन वसंत पाटील (रा. गंगापूर रोड) हे सख्खे बहीण-भाऊ आहेत. त्यांच्यात शरणपूर रोडवरील एका इमारतीतील निवासी मालमत्तेच्या हक्कावरून वाद आहेत. गेल्या ऑक्‍टोबरमध्ये राजश्री शिंदे यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांत नितीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या वादाच्या तक्रारीचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुमेध सोनोने यांच्याकडे आहे. मात्र, या तपासादरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे दोघा उपनिरीक्षकांवर निलंबनाची वेळ आली. 

गुन्ह्याचा तपास सुरू असताना, तक्रारदार श्रीमती शिंदे भावाच्या घरी पोचल्या, तेव्हा त्यांच्यातील वाद उफाळून आला. त्यात श्रीमती शिंदे यांनी भाऊ नितीन यांच्याविरोधात ठार करण्याचा प्रयत्न केल्याची दुसरी फिर्याद सरकारवाडा पोलिसांत दाखल केली. या दुसऱ्या गुन्ह्याचा तपास त्याच पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक आदिनाथ मोरे यांच्याकडे होता. ठार करण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात पाटील यांना आधी पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळून त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात झाली. 

सख्ख्या बहिणीने पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने कटकारस्थान केल्याची भावना झालेले पाटील यांनी या प्रकरणाचा भांडाफोड करण्याचा निश्‍चय केला. त्यानुसार त्यांनी कारागृह प्रशासनाची परवानगी घेतली व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे तक्रार केली. त्यात, बहिणीने पोलिस उपनिरीक्षकाच्या मदतीने खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे वास्तव मांडले. स्वत:च आपल्या घरी येऊन बहिणीनेच गोंधळ घातला व नंतर तिनेच पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनीही ठार करण्याच्या प्रयत्नाबाबत कुठलीही शहानिशा न करता थेट गुन्हा दाखल करीत तुरुंगात पोचविले, अशा आशयाची तक्रार पाटील यांनी मांडली. त्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने पोलिस आयुक्तांनी सविस्तर चौकशी केली. त्यानुसार दोन्ही गुन्ह्यांत तपास अधिकाऱ्यांनी हलगर्जी करीत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत श्री. सोनोने व मोरे या दोघांना निलंबित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT