nashik
nashik 
उत्तर महाराष्ट्र

प्रा. संदीप बेडसे यांना 'टीडीएफ'तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माळमाथा परिसरातील छडवेल-कोर्डे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व शिरपूर येथील आर.सी. पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. संदीप त्र्यंबकराव बेडसे (धुळे) यांची आज सदाशिव पेठ, पुणे येथील महाराष्ट्र हायस्कुलमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या उमेदवार निवड सभेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी 'टीडीएफ' अर्थात 'महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी'तर्फे उमेदवारीसाठी सर्वानुमते निवड झाली. विभागीय अध्यक्ष हिरालाल पगडाल सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर आदी पाचही जिल्ह्यातील एकूण 12 इच्छुक यावेळी उपस्थित होते. जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर 'टीडीएफ'तर्फे लोकशाही पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांमार्फत विभागस्तरावरून राज्य कार्यकारिणीकडे इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. आज झालेल्या निवड चाचणीत कार्यकारिणीमार्फत प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान घेण्यात आले. पाचही जिल्ह्यात 'टीडीएफ'चे 10 युनिट असून प्रत्येक जिल्हा, महानगरचे अध्यक्ष व कार्यवाह यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक, विभागीय अध्यक्ष, कार्यवाह व माजी आमदार आदींसह नाशिक विभागातील एकूण 30 मतदारांपैकी 28 मतदार हजर होते.

त्यात प्रा. संदीप बेडसे (धुळे) यांना सर्वाधिक 19 मते मिळाली. अन्य इच्छुकांमध्ये एस.डी.भिरुड (जळगाव) यांना 5 मते, राजेंद्र लांडे (अ. नगर) यांना 4 मते, तर आर.डी. निकम (नाशिक), निशांत रंधे (धुळे), भाऊसाहेब कचरे पाटील (अ. नगर), आप्पासाहेब शिंदे (अ. नगर) यांच्यासह इतर उमेदवारांना 0 शून्य मते मिळाली. पसंतीक्रमानुसार सर्वाधिक 19 मते प्रा. बेडसे यांना मिळाल्याने विभागीय कार्यकारिणीने त्यांच्या नावाची शिफारस राज्य कार्यकरिणीकडे केली. राज्य कार्यकारिणीने घेतलेल्या मुलाखतीत प्रा. संदीप बेडसे यांना सर्वाधिक 80% मते मिळाल्याने विभागीय व राज्य कार्यकारिणी अर्थात निवड समितीने 'टीडीएफ' तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रा.संदीप बेडसे यांच्या नावाची घोषणा केली...

या विभागीय व राज्य कार्यकारिणीच्या उमेदवार निवड सभेस 'टीडीएफ'चे राज्याध्यक्ष विजय बहाळकर, कार्यवाह हनुमंत भोसले, विभागीय अध्यक्ष हिरालाल पगडाल, माजी आमदार टी. एफ. पवार, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी आमदार जयवंतराव ठाकरे, ज्येष्ठ नेते वि. मा. भामरे, आबा कोकाटे, भारत घुले, एच.जी. इंगळे, एस.के. चौधरी, आर.एच. बाविस्कर, जे. व्ही. पाटील, राऊत सर, जमाले सर, अलमान सर, कुंदे सर आदी उपस्थित होते. प्रा. बेडसेंना 'टीडीएफ'चे राज्याध्यक्ष विजय बहाळकर यांच्या सहीचे अधिकृत उमेदवारीचे निवड पत्र देण्यात आले. प्रा. बेडसे यांच्या उमेदवारीने पाचही जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे शिक्षकांसह पाचही जिल्ह्यांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT