Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

मेथीपूरनगर म्हणजे आताचे सामुंडी गाव

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः धाडोशी, खाडाची वाडा आणि सामुंडी अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सामुंडी (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावची लोकसंख्या दोन हजार. हे स्थलांतरीत असून पूर्वी आलेल्या संसर्ग रोगामुळे गाव स्थलांतरित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

गावातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पूर्वी गावाचे नाव मेथीपूरनगर म्हणून परिचित होते. स्वातंत्र्यावेळी गावात भलीमोठी मिरवणूक काढल्याच्या आठवणीला ग्रामस्थांनी उजाळा दिला. 
त्र्यंबकेश्‍वर-खोडाळा रस्त्यावरील गावात हनुमान, भैरोबा आणि मरीआई मंदिर आहे. गावात पूर्वी बोहाडा व्हायचा. त्याची जागा आता अखंड हरिनाम सप्ताहाने घेतली. गेल्या दहा वर्षां पासून सप्ताह होतो. भजनी मंडळात काळू गोरे, पांडुरंग ढोंगे, शंकर गवारी, चंदर गोरे, राजू खाडे सहभागी असतात. लालू गारे, बाळू गारे ही मल्लांची जोडी पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. गावात पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याच गावातील सुरेश गारे हे तलाठी झाले आहेत. कृष्णा वाघ हे प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गावाजवळील जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. तसेच जंगलात कोल्हे, तरस, बिबटे, रान ससे आणि रानडुक्कर आढळतात. गावात येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत व जेवणाची व्यवस्था ग्रामस्थ करतात. गावाच्या बाजूला आडोळी डोंगर आहे, तर धाडोशी येथे गौतम ऋषींचे मंदिर आहे. 

गौतम ऋषी धाडोशी येथे येऊन गेल्याची माहिती पूर्वजांकडून आताच्या पिढीपर्यंत पोचली आहे. पूर्वी आमच्या गावात बोहाडा व्हायचा. तो बंद झाला आहे. 
- अंतू गारे (जेष्ठ ग्रामस्थ) 
 

गावाचा विकास व्हायला हवा. गावात मैदान नाही. सरकारी दवाखाना नाही. त्यामुळे खासगी दवाखान्यात रुग्णांना न्यावे लागते. गावातील पाण्याची समस्या मिटायला हवी. 
- कैलास गारे (ग्रामस्थ) 

विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना विविध उपक्रम राबवले जातात. नैसर्गिक चित्रे रेखाटण्यात आमचे विद्यार्थी तरबेज आहेत. 
- तुकाराम गवारी (शिक्षक) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT