Officers of Lokmanya Multipurpose Society handing over the check of donation of 1 crore for the students of Central Hindu Military Education Society to the office bearers of the organization. esakal
नाशिक

Nashik News : भोसलातील विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमान्‍य’तर्फे 1 कोटींची देणगी

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्‍यातर्फे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला स्‍कूलमधील विद्यार्थ्यांसाठी १ कोटींची देणगी जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्‍यातर्फे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला स्‍कूलमधील विद्यार्थ्यांसाठी १ कोटींची देणगी जाहीर केली आहे.

दरवर्षी गुणवंतांच्या यादीत पहिल्‍या क्रमांकाच्‍या आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना या देणगीच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जाईल. (1 crore donation by Lokmanya for students of Bhonsala military education society nashik news)

याबाबतची कार्यालयीन कागदपत्रांची पुर्तता नुकतीच केली असून भोसलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत धनादेश सुपूर्द केला. आगामी वर्षांपासून ही शिष्यवृत्ती दिली जाईल. लोकमान्यच्या संचालिका सई ठाकूर- बिजलानी, सल्लागार प्रीतम बिजलानी, नाशिक क्षेत्रीय व्यवस्थापक हेमंत फडके, बांधकाम व्यावसायिक श्वेता कोठारी, भोसलाचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश भिडे, सरकार्यवाह हेमंत देशपांडे, माधव बर्वे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

शिष्यवृत्तीबाबत लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर म्‍हणाले, की सीएचएमई ही संस्‍था देशाची युवा पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. या कार्यात आपलाही सहभाग असावा, या विचारातून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे.

यामुळे गरजू विद्यार्थ्याला मदत होणार असून त्याचा प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. अभ्यास करताना शुल्‍क भरण्याचा ताण कमी होईल. सोबतच लोकमान्यचे भारतीय लष्करासोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. लष्करात कार्यरत आजी-माजी जवान, शहीद जवानांच्या विधवा पत्नी यांना लोकमान्यचे ठेवीदार बनल्यानंतर अर्धा टक्का अधिक व्याज दिले जाते. या शिष्यवृत्तीमुळे हे नाते अधिक दृढ होईल.

सई ठाकूर- बिजलानी म्‍हणाल्‍या, की देशाच्या विकासात लोकमान्यने नेहमीच आपली जबाबदारी उचलली आहे. याआधीही अनेक माध्यमातून लोकमान्य जनसेवा करत आली आहे. बेळगावमध्ये असलेल्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या संग्रहालयाचे संवर्धन, शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी, दान स्वरूपात रुग्णवाहिका अशा स्वरूपात नेहमीच मदत केली आहे. लोककल्प फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील ३२ खेड्याचे पालकत्व घेतले आहे. महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT