nashik news esakal
नाशिक

चक्क 1 रुपयात 1 लिटर पेट्रोलची ऑफर! पेट्रोलपंपावर तोबा गर्दी

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : एकीकडे पेट्रोलचे (petrol) भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र ‘एक रुपयात एक लिटर पेट्रोल’ ची घोषणा ऐकू येताच सर्व वाहनधारकांच्या गाड्या पेट्रोलपंपाकडे वळल्या आणि एकच गर्दी पाहायला मिळाली. जमलेली गर्दी पाहून कोणाला कळेच ना की नेमकं काय सुरू आहे?

पेट्रोलपंपावर वाहनधारकांची चांगलीच झुंबड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ ‘एक रुपयात, एक लिटर पेट्रोल’ची ऑफर दिल्याने अंबडमधील एका पेट्रोलपंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग २७ मधून अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झालेले व सध्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेले प्रशांत खरात यांनी गुरुवारी (ता. २०) आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक रुपयात एक लिटर पेट्रोल’ भरण्याची भन्नाट कल्पना लढविली. त्यांच्या या आवाहनाला वाहनधारक व समर्थकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अंबड औद्योगिक वसाहतीमधील ठरवून दिलेल्या एका पेट्रोलपंपावर वाहनधारकांची चांगलीच झुंबड उडाली होती.

दुपारनंतर ही ‘ऑफर’ बंद करण्यात आली

येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने दुपारनंतर ही ‘ऑफर’ बंद करण्यात आली. तोपर्यंत शेकडो लिटर पेट्रोल वाहनधारकांनी भरल्याचा दावा दस्तुरखुद्द बर्थडे बॉय प्रशांत खरात यांनी केला आहे अखेर दुपारी बारानंतर हा यशस्वी प्रयोग बंद केल्याने गर्दी निवळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: विद्यार्थी आंदोलनात हस्तक्षेप करण्याचे कारण काय? बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयावर CJI सूर्यकांत भडकले

Mitchell Starc: मिचेल स्टार्कने रचला इतिहास! कपिल देवांना मागे टाकलं, मुरलीधरन नंबर-1; टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

Konkan Rare Flower Discovery : नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली वनस्पती कोकणात! मशालीसारख्या दिसणाऱ्या दुर्मीळ 'कंदीलपुष्पा'चे वैशिष्ट्य काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

SCROLL FOR NEXT