Health Camp esakal
नाशिक

Health Camp: महाआरोग्य शिबिरात 10 लाख रुग्णांची तपासणी; जिल्हा रुग्णालयात 2000 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या डिसेंबर महिन्यात स्व. आनंद दिघेजी साहेब महाआरोग्य मेळावा जिल्ह्यात घेण्यात आला असता, त्याअंतर्गत सुमारे १० लाख रुग्णांची या शिबिराचा लाभ घेत आरोग्याची तपासणी करण्यात आली होती.

यातील २ हजार ५१ रुग्णांवर विविध आजारासंदर्भातील शस्त्रक्रिया नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. (10 lakh patients screened at Maha Arogya camp Successful surgery on 2000 patients in district hospital nashik news)

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक जिल्ह्यात आनंद दिघेजी साहेब महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य मेळाव्यांतर्गत जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नाशिक व मालेगाव महापालिका रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांच्या आरोग्याची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.

या महिनाभरात जिल्हाभरात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १० लाख २५ हजार १९२ रुग्णांनी आरोग्याची तपासणी करीत लाभ घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य चाचणी घेतल्यानंतर त्यात आजाराचे निदान आढळून आल्यास त्या रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून या रुग्णांची पुन्हा आरोग्य चाचणी घेण्यात आल्यानंतर, शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यास त्यांच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्येच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्‍यकता नसेल त्यांना औषधोपचार देण्यात आले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या महाआरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ हजार ५१ रुग्णांवर विविध स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये, पोटातील विविध विकारांशी संबंधित शस्त्रक्रिया असून यात ॲपेडिंक्स, हार्निया, मुतखडा आदींचा समावेश आहे.

तसेच, हाडांच्या शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणसंदर्भातील शस्‌त्रक्रिया, महिलांच्या गर्भपिशवीशी संबंधित शस्त्रक्रिया, प्रसुतीसाठी आलेल्या महिला रुग्णांवरील सिझेरियन शस्त्रक्रिया आदी स्वरूपाच्या शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्या आहेत.

"डिसेंबर २०२२ या महिन्यात जिल्हाभर आरोग्य विभागांतर्गत रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले असता, त्यामध्ये आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या आजारातील रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत."

- डॉ. अनंत पवार, नोडल अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Navi Mumbai: नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा, नेमकं प्रकरण काय?

Sangli Youth Endlife : तांदूळवाडी येथील तरुण अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Mumbai News: आता केस पेपरसाठी रांग लावावी लागणार नाही, पालिका रुग्णालये होणार पेपरलेस; कधीपासून? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT