नाशिक : मागील आठवड्यात १३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत गटात प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा दहा माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नागपूरच्या चालू हिवाळी अधिवेशनातच प्रवेशाचा कार्यक्रम आटोपण्याची तयारी करण्यात आली आहे. (10 more former shivsena corporators will join Shinde group sanjay raut uddhav thackeray Nashik Political News)
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला संघटना पातळीवर झटके देण्याची प्रयत्न वारंवार होत आहे. जून महिन्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाला नाशिकमध्ये फारसे यश मिळाले नाही. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या व्यतिरिक्त दमदार असे नेतृत्व शिंदे गटात सहभागी झाले नाही.
मात्र, मागील आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत जवळपास १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, चंद्रकांत खाडे, पुनम मोगरे, संगीता जाधव, अमोल जाधव, प्रताप मेहरोलीया, यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
या राजकीय झटक्यातून शिवसेना सावरत नाही तोच ज्यांच्याकडे संघटना बळकट करण्याची जबाबदारी होती, ते संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हेदेखील नागपूरमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद शहरात खच्ची होत असताना दुसरीकडे शिंदे गटाची ताकद मात्र वाढताना दिसत आहे. विकासकामांसाठी निधी व दमदार नेत्यांचा शिंदे गटाकडे कल वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन दहा नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आले आहे.
अधिवेशन काळातच होणार प्रवेश
नागपूरला राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळातच दहा माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात सिडकोतील तीन, नाशिक रोड विभागातील दोन, सातपूर विभागातील एका, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.