Nandurmadhmeshwar Dam latest marathi news esakal
नाशिक

नाशिक : जायकवाडी क्षमतेच्या 10 टक्के पाणी नांदूरमधमेश्‍वरमधून रवाना

महेंद्र महाजन

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधारमुळे (Rain) गंगापूर, दारणा धरणातून (Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्यासोबत पावसाचे पाणी जायकवाडी धरणाकडे नांदूरमधमेश्‍वर धरणातून रवाना होत आहे.

बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या क्षमतेच्या १० टक्क्यांहून अधिक पाणी रवाना होईल. आज सकाळपर्यंत साडेपाच टीएमसीहून अधिक पाणी गोदावरीमधून जायकवाडीकडे निघाले होते. तसेच आणखी साडेसहा टीएमसी पाणी रवाना झाले आहे. (10 percent of Jayakwadi capacity water shipped from Nandurmadhameshwar Nashik Latest Marathi News)

दारणा धरणातून १५ हजार ५७२ क्यूसेस विसर्ग सकाळी सुरु होता. रात्री दहाला हा विसर्ग १२ हजार ९८६ क्युसेसपर्यंत कमी करण्यात आला होता. मात्र गंगापूर धरणातून १० हजार ३५ क्यूसेस विसर्ग सुरु होता.

रात्री दहाला होळकर पुलाखालून ११ हजार ९३३ क्यूसेस पाणी गोदावरीमधून वाहत होते. नांदूरमधमेश्‍वरचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून सकाळी ७२ हजार ७१७ क्यूसेस विसर्ग सुरु होता. दुपारी बाराला तो ७८ हजार २७६ क्यूसेस, त्यानंतर ७९ हजार ८४८ क्यूसेस विसर्ग करण्यात आला होता.

रात्री नऊला ७७ हजार ४२७ क्यूसेस ठेवण्यात आलेले विसर्ग कायम राहिला. दरम्यान, आज सकाळपर्यंत दारणा धरणातून एक हजार ५९३, गंगापूरमधून ६१५, कडवामधून ४३२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते.

वरुणराजाच्या मेहरबानीमुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या ६५.४६ टक्क्यांपर्यंत पोचल्या आहेत. त्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून सोयाबीनखालील क्षेत्र १४०.३९ टक्क्यांच्यापुढे पोचले आहे.

मूग-उडीद क्षेत्र वर्ग

मॉन्सूनचे वेळेवर आगमन न झाल्याने मूग आणि उडीदचे क्षेत्र घटले आहे. हे क्षेत्र सोयाबीनकडे वर्ग झाले असून मक्याचे क्षेत्र सोयाबीनच्या जवळपास पोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मक्याची लागवड आतापर्यंत ९८.७५ टक्के क्षेत्रावर झाली आहे.

याशिवाय कापसाचे क्षेत्र वाढत चालले असून कापसाची लागवड आतापर्यंत ८९.५७ टक्के क्षेत्रावर झाली आहे. इतर पिकांच्या पेरणीचे आतापर्यंतच्या क्षेत्राची टक्केवारी अशी : तूर-३८.३९, मूग-२८.१, उडीद-१७.७७, भात-४.९१, ज्वारी-८९.११, बाजरी-५१.५४. पावसाला विलंब झाल्याने भाताची रोपे आदिवासी शेतकऱ्यांनी टाकली नव्हती.

आताच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी भाताची रोपे टाकण्याची कामे वेगाने सुरु केली आहेत. त्याचवेळी यंदाच्या खरिपात बाजरी आणि तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसताहेत.

तालुकानिहाय पेरण्यांची टक्केवारी

० मालेगाव-९३.६९

० बागलाण-७९.३५

० कळवण-७८.४२

० देवळा-७४.१३

० नांदगाव-९७.६५

० सुरगाणा-१०.६५

० नाशिक-२०.०४

० त्र्यंबकेश्‍वर-२.६२

० दिंडोरी-१९.६३

० इगतपुरी-५.१४

० पेठ-७.८२

० निफाड-६३.१

० सिन्नर-७८.४८

० येवला-८९.२९

० चांदवड-५७.८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT