Fire broke out at scrap shops near Gharkul Yojana in Chunchale Shiwar. esakal
नाशिक

Nashik News : चुंचाळे शिवारातील 10 भंगारची दुकाने आगीत खाक

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला शुक्रवारी (ता. २४) पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. (10 scrap shops in Chunchale Shiwar gutted in fire Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आगीमुळे धुराचे मोठे, मोठे लोट दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे सिलिंडरच्या स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत नऊ ते दहा दुकाने जळून खाक झाली आहेत.

सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या अग्नितांडवाचा फटका कचरा वेचून गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांना ही बसला असून, सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत.

आगीची माहिती मिळताच नवीन नाशिक, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या. भंगारात रबर, टायर व प्लॅस्टिकचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.

या परिसरात भंगाराचे २५ ते ३० दुकाने आहेत. त्यातील ९ दुकानांना ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरा ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT