railway esakal
नाशिक

अग्निपथच्या आंदोलनाचा फटका : सलग दुसऱ्या दिवशी 10 रेल्वे रद्द

अग्निपथ योजनेला देशभरातून कडाडून विरोध होत असताना उफाळलेल्या हिंसाचाराचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड- नाशिकरोड : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agnipath yojna) देशभरातून कडाडून विरोध होत असताना उफाळलेल्या हिंसाचाराचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असल्याने मनमाड रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या १० प्रवाशी गाड्या (Indian Railway) आजही रद्द करण्यात आल्या. इतर सहा प्रवासी रेल्वेगाड्या वीस तासाहून अधिक काळ उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांनी नाइलाजाने खासगी वाहनांचा आधार घेतला तर पर्याय नसलेल्यांना घरी परतण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नव्हता. (Nashik news)

अग्निपथ योजनेमुळे उत्तर-पूर्व भारतात सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रवासी गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातील प्रवासांचे वेळापत्रक आजही कोलमडले होते.

भुसावळकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

१) गाडी क्रं : ११०६१ कुर्ला - जयनगर एक्सप्रेस

२) गाडी क्रं : १३२०२ कुर्ला - पाटणा एक्सप्रेस

३) गाडी क्रं : १२३३६ कुर्ला - भागलपूर एक्सप्रेस

४ ) गाडी क्रं : १२१४९ पुणे - दानापूर एक्सप्रेस

५ ) गाडी क्रं : १२१४१ कुर्ला - पाटलीपुत्र एक्सप्रेस

भुसावळहून मनमाडमार्गे रद्द गाड्या

१) गाडी क्रं : १३२०१ पाटणा - कुर्ला एक्सप्रेस

२ ) गाडी क्रं : १२१५० पाटणा - पुणे एक्सप्रेस

३) गाडी क्रं : ८२३५५ पाटणा - मुबंई एक्सप्रेस

४) गाडी क्रं : १२१४२ पाटलीपुत्र - कुर्ला एक्सप्रेस

५) गाडी क्रं : ११०६२ जयनगर - कुर्ला एक्सप्रेस

उशिराने धावत असलेल्या गाड्या

१ ) मुंबई - हावडा कोलकता एक्सप्रेस - २२ तास १५ मिनिटे.

२ ) मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस - २१ तास ३० मिनिटे.

३ ) पनवेल - गोरखपुर एक्सप्रेस - १५ तास ५० मिनिटे.

४ ) कुर्ला - कानपुर एक्सप्रेस - १७ तास १५ मिनिटे.

५ ) कुर्ला जयनगर एक्सप्रेस - ११ तास ३० मिनिटे.

६ ) काकिनाडा -शिर्डी साईनगर एक्सप्रेस - ६ तास.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT