Accident in Nashik city
Accident in Nashik city sakal
नाशिक

नाशिक : वर्षभरात १११ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे मृत्यू

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक शहर (Nashik city) पोलिसांनी शहरात १५ ऑगस्टपासून हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. त्यात विनाहेल्मेट(without Helmet) वाहनधारकांचे प्रबोधन व समुपदेशन करण्यात येते. याअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत १० हजार ५६१ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले. वर्षभरात १२४ दुचाकीस्वारांचे अपघातात (Accident) मृत्यू झाला असून, त्यातील १११ जण विनाहेल्मेट दुचाकीस्वार होते.

स्वातंत्र्यदिनापासून सुरू असलेल्या उपक्रमाला शहरात चांगला प्रतिसाद लाभला आहे. पोलिसांनी ३० नोव्हेंबरला शहरात गर्दीचे १२ ठिकाण निश्चित केले. त्यावर विनाहेल्मेट चालकांचे दोन तासांचे समुपदेशन करण्यात येते आहे. त्यात समुपदेशनात वाहतूक नियमांच्या पुस्तकांचे वाचन, त्यानंतर परिक्षा घेतल्या जातात. १ ते ३१ नोव्‍हेंबर दरम्यान अशा १० हजार ५६१ विनाहेल्‍मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले. हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक शहरात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशा वर्षभरात १२४ दुचाकीस्वारांचे मृत्यू झाले आहेत.

त्यापैकी १११ जणांनी डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. शहरात दर महिन्याला १० या सरासरीने दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू होतात. असाच याचा अर्थ आहे. शहरातील दुचाकीस्वारांचे वाढत्या अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर विनाहेल्मेट धारकांचे प्रबोधन केले जाते. एकाचवेळी ई- चलन कार्यप्रणाली अंर्तगत पहिल्यांदा विनाहेल्मेट दुचाकीस्वारांसह पाचशे रुपयांची दंडाची कारवाई, दुसऱ्यांदा सापडल्यास १ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. दंड न भरल्यास वाहन ताब्यात घेतले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT