Nashik Corona Updates esakal
नाशिक

Nashik Corona Updates : जिल्ह्यात ११३ कोरोनामुक्‍त, एक मृत्‍यू

अरूण मलाणी

नाशिक : ग्रामीण भागाच्‍या तुलनेत आता नाशिक शहरातही नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढते आहे. रविवारी (ता. २६) जिल्ह्यात शंभर रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर, ११३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ००६ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

प्रलंबित अहवालांची घटली संख्या

रविवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमधील ५१, नाशिक शहरातील ४३, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाहेरील चौघांचा समावेश आहे. दिवसभरात उपचारादरम्‍यान एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा रूग्ण नाशिक ग्रामीण क्षेत्रातील होता. ११३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रलंबित अहवालांची संख्या घटली असून, सायंकाळी उशीरापर्यंत २२० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक शहरातील १७०, नाशिक ग्रामीणमधील ३८, तर मालेगावच्‍या बारा रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८११ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ७९४ रुग्‍ण हे नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील सहा, तर मालेगावच्‍या पाच रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार सत्ता केंद्र,‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात; अंतर्गत हालचालींना वेग

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

Raja Hindustani: आमिर-करिश्माच्या किसिंग सीनला सेन्सॉर लावणार होतं कात्री पण मदतीला धावून आला मराठी दिग्दर्शक

Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

''प्राची बॉस होती, निशिका-पाखी तिचं ऐकायच्या, रात्री २ वाजता त्यांनी...''; तीन बहिणींनी जीवन संपवल्याप्रकरणी वडिलांचा धक्कादायक खुलासा!

SCROLL FOR NEXT