11th admissions process esakal
नाशिक

Nashik 11th Admission : विशेष फेरीच्‍या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजार 513 विद्यार्थ्यांचे प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्‍या पहिल्‍या विशेष फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. यादीत चार हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड केलेली असताना दोनच दिवसांत दोन हजार ५१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. (11th admission 2 thousand students take admission on college on special merit list nashik news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत शिक्षण विभागाने यापूर्वी तीन नियमित प्रवेशफेऱ्या राबविल्‍या होत्‍या. यानंतर रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी पहिली विशेष फेरीची गुणवत्ता यादी काल (ता. २४) प्रसिद्ध करण्यात आली.

या यादीत चार हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड केली होती. अवघ्या दोन दिवसांत मंगळवार (ता. २४)पर्यंत दोन हजार ५१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी गुरुवार (ता. २७)पर्यंत संधी उपलब्‍ध असेल. दरम्‍यान, सद्यःस्‍थितीत दहा हजार ४२५ जागा रिक्‍त असून, या जागांवर प्रवेशासाठी पुढील प्रक्रिया कशी असेल, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

म्‍हणून फेरीला मिळतोय प्रतिसाद

यापूर्वी राबविलेल्‍या प्रवेशफेऱ्यांच्या तुलनेत विशेष फेरीत सहभागी विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या पहिल्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून पुढील प्रक्रियेची वाट न पाहता, प्रवेश निश्‍चित केले जात असल्‍याचे बोलले जाते. त्‍यामुळेच नियमित फेरीपेक्षाही पहिल्‍या विशेष फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्‍याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT