12 crore hit due to drop prices of grapes Bangladesh tax per kg gets less 20 rupees Sakal
नाशिक

Grape Price : द्राक्षांचे भाव घसरल्याने १२ कोटींचा फटका

बांगलादेशमध्ये करामुळे किलोला २० रुपये मिळताहेत कमी

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : द्राक्षांचा हंगाम सुरु झाला असताना एक आठवड्यापूर्वी धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा आता डोके वर काढले आहे. अवकाळीचे संकट असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना १२ कोटींचा फटका बसला आहे.

त्यातच, बांगलादेशमधील कर काही केल्या कमी झाला नसल्याने किलोला २० रुपये कमी भावाने शेतकऱ्यांना द्राक्षे द्यावे लागताहेत. बांगलादेशसाठी गेल्यावर्षी ६० ते ६२ रुपये किलो भावाने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना द्राक्षे दिली होती.

आता ४० ते ४२ रुपये भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. गेल्यावर्षी ब्रिटनसाठी ७० ते ७५ रुपये किलो, तर युरोपसाठी ५० ते ७० रुपये किलो भावाने शेतकऱ्यांची द्राक्षे खरेदी केली गेली होती.

आताच्या हंगामात इंग्लंडसाठी ६० ते ६२, तर युरोपसाठी ४५ ते ५५ रुपये किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. एका आठवड्यात द्राक्षांचा किलोचा भाव दहा रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हे कमी काय म्हणून रद्दीपेक्षा कमी भावात द्राक्षे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. स्थानिक बाजारपेठेत लांब आकाराच्या द्राक्षांना ३० ते ३२ आणि गोल आकाराच्या द्राक्षांना २० ते २२ रुपये किलो असा भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी पॅकींगसाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या रद्दीचा भाव किलोला ३५ ते ४० रुपयांपर्यंत आहे.

अवकाळी पाऊस, ढगाळ हवामानामुळे द्राक्षांच्या मण्यांमधील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय निर्यातीसाठी द्राक्षांची काढणीचा वेग मंदावला आहे. मुळातच, द्राक्षांच्या उत्पादनासाठी किलोला २० ते २५ रुपये खर्च येत असून त्यापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांना द्राक्षे विकावी लागत आहेत. मात्र छाटणी विखुरली गेली असल्याने अखेरच्या टप्प्यात द्राक्षे बाजारात विक्रीसाठी जाण्याचे प्रमाण सुरळीत राहील, अशी स्थिती दिसत आहे.

- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT