burglary  Google
नाशिक

नाशिक : जेल रोडला 12 लाखांची घरफोडी

विनोद बेदरकर

नाशिक : जेल रोडला शिक्षक कॉलनी परिसरात बंद बंगल्यात घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ११ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शकुंतला नारायण पाटील (वय ६४, आई बंगला, शिक्षक कॉलनी जेल रोड) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीमती पाटील कुटुंबासह २९ जुलैला बाहेर गावी गेल्या होत्या. काल रविवारी (ता.१) दुपारी अडीचला घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. त्यांच्याआई बंगल्यातील मुख्य दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटवून घरात प्रवेश करीत घरातील बेडरुमचे दोन्ही लोखंडी कपाटातील लॉकर व कपाटात ठेवलेल्या लोखंडी पेटीतील २ लाख ५० हजाराची रोकड, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ८० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ८० ग्रॅम वजनाचे दोन चप्पलाहार, ४० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन, ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, २२ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, चांदीचे नाणे असा सुमारे ११ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक निरीक्षक शेळके तपास करीत आहे.

आधी भररस्त्यात लूटमार नंतर दुसऱ्यावर चाकुचे वार

नाशिक - पंचवटीतील गणेशवाडीत काल दोघा सराईतांसह चौघांनी सायंकाळी गोंधळ घातला. आधी रस्त्यात चार चाकी अडवून सोन्याचे दागिणे ओरबडले त्यानंतर काही वेळाने सहजीवन भागात खुन्नसने का बघतो म्हणत एकावर चाकूचे वार केले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विकी बजाज अजय भोई, अजय म्हाताऱ्या गुडु फसाळे अशी संशयितांची नावे आहे. या संशयितांनी काल रविवारी (ता.१) सायंकाळी सहाला गणेशवाडीतील साईबाबा मंदीर परिसरात चारचाकी गाडी अडवून चालकाच्या व त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे ओरबडून नेण्याचा प्रकार उघडकीस आला. नदीन निसार खान (वय ३०, भोईगल्ली भद्रकाली) हे त्यांच्या फोर्ड फिगो (एमएच १५ सीटी ९०९१) हिच्यातून जात असतांना संशयितांनी त्यांची गाडी अडविली. गाडीच्या काचेवर बुक्के मारुन काचेचे नुकसान केले. त्यानंतर नदीन खान यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चेन तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे तीस हजार रुपयांची सोन्याची पो ओबरडून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.

खुन्नसने पाहिले म्हणून चाकूचे वार


नाशिक : त्यानंतर काही वेळातच पंचवटीतील गणेशनगर भागात काल खुन्नसने का पाहतो असे म्हणत चौघांनी एकाला बेदम मारहाण करीत चाकुचे वार केले. रविवारी (ता.१) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास विकी बजाज, अजय भोई, अजय म्हाताऱ्या गुड्डू फसाळे या चौघांनी सहजीवण नगर भागात गणेश शरद पवार (वय २०) व प्रणव देवरे हे दोघे शौचालयातून बाहेर येत असतांना या दोघांना गाठून तुम्ही दुपारी दोनला माझ्‍याकडे खुन्नसने का पाहिले. असे म्हणत, तुझा भाऊ कार्तीक पवार याने पण माझ्याशी भांडण केले आहे. असे म्हणत विकी बजाज याने वाद शिवीगाळ केली. तसेच कमरेचा चाकू काढून त्याच्यावर वार केले. अजय म्हाताऱ्या याने पाठीत दगड घातला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! उच्चांकापासून 21 हजारांनी स्वस्त; दर आणखी कमी होणार? जाणून घ्या आजचा भाव

ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Sangamner Accident: पोहण्याचा आनंद ठरला काळ; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, दगडाच्या खाणीत पोहायला गेले अन् परतलेच नाहीत

VIP Darshan Ban: यंदाही आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आचारसंहितेतून आषाढी कामांना वगळण्यासाठी प्रस्ताव

SCROLL FOR NEXT