Bhadrakali police seized mobile phones from mobile thieves as well as suspects esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरट्याकडून 12 मोबाईल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली पोलिसांकडून मोबाईल चोरास अटक करून १२ मोबाईल हस्तगत केले. इम्रान हनीफ पठाण (२९, रा. विनयनगर) असे संशयिताचे नाव आहे. भागचंद लद्धड यांच्या तक्रारीवरून शनिवारी (ता. ५) मोबाईल चोरीचा भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे संदीप शेळके आणि विशाल काठे यांना संशयित इम्रान पठाण अमरधाम रोड शितळादेवी मंदिर परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. (12 mobile phones seized from thief Nashik Crime News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक गुन्हे दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, उपनिरीक्षक भूषण देवरे, कर्मचारी संदीप शेळके, विशाल काठे, श्यामकांत पाटील, संजय पोटिंदे यांनी सापळा रचत संशयितास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी दरम्यान त्याची अधिक चौकशी केली त्यात त्याने अन्य विविध ठिकाणी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल हस्तगत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT