Road Accident esakal
नाशिक

खराब रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच

अरुण भामरे

अंतापूर (नाशिक) : पिंपळनेर ते सटाणा रस्त्याच्या कामात सुसूत्रता नसल्याने वाहनधारक व प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. ताहाराबादच्या मोसम नदीवरील पुलाचे काम लवकर हाती घेऊन दळणवळणाची गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंपळनेर- ताहाराबाद- सटाणा या रस्त्याचे काम तीन वर्षापासून हाती घेण्यात आले असून, रस्ता करीत असताना अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने काम न केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. कामात एकसारखेपणा नसल्याने आणि त्यात आता पाऊस सुरू झाल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज लहान- मोठ्या अपघातांमुळे आतापर्यंत या रस्त्यावर साधारण दोन डझन व्यक्तींचा मृत्यू होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

त्यानंतरही संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी साईडपट्ट्यांचा भराव योग्य टाकला नसल्याने अपघात होत आहे. ताहाराबाद- मोसम नदीवरील पुलाची क्षमता संपल्याने त्या पुलावरुन वाहन चालवणे किंवा पायी चालणे धोकादायक झाले आहे. मांगीतुंगी फाटा, करंजाड, पिंगळवाडे व आवाठी गावाजवळ रस्ता खोल केल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी सर्व्हिस रोड करण्याची अत्यंत गरज आहे.

याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वरिष्ठ विभागाने दखल घेऊन कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या कामास अजून ठेकेदार वाढवून काम उत्कृष्ट पद्धतीने करावे, अशी मागणी कसमादे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुरेश पवार, ताहाराबाद सोसायटीचे अध्यक्ष के. पी. जाधव, मधुकर साळवे, यशवंत पवार, दिलीप कांकरीया, मिलिंद जाधव, महावीर पांडे, जितू जैन, ईश्‍वर खरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

"ताहाराबाद शेकडो गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून, या परिसरात मांगीतुंगी येथील जैन मंदिर, द्वारकाधीश साखर कारखाना, साल्हेर- मुल्हेर किल्ला, अंतापूर येथील दावलमलिक बाबा, शंकर महाराज जन्मस्थान, कमलनयन समाधी स्थान यासह गुजरात राज्य जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्ता कामात दिरंगाई होत असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काम व्यवस्थित न केल्यास आंदोलन उभारू."

- मिलिंद चित्ते, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, ओबीसी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT