teacher.jpg 
नाशिक

Covid19 : आदिवासी विभागातील '१२ हजार' शिक्षक देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता अडीच कोटींचा निधी!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येवला) कोरोनाचा सामना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. त्याच्या मदतीला आता अनेक हात सरसावले असून, राज्यातील आदिवासी विभागातील सर्व शिक्षकांनी आपले दातृत्व दाखवत मदतीचा हात पुढे केला आहे. विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जमा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने घेतला आहे. यातून राज्यातील 12 हजार कर्मचाऱ्यांचे सुमारे अडीच कोटी रुपयांची मदत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी दिली. या मदतीचे पत्र मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व संबंधितांना देण्यात आले आहे. 

एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागास देण्याचा निर्णय

कोरोना विषाणूमुळे सर्वजण मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या संकटावर मात करताना राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड, अध्यक्ष संतोष राऊत, कार्याध्यक्ष सुभाष बावा, सरचिटणीस संजय जाधव आणि खजिनदार पंढरीनाथ जाधव, तसेच सर्व विभागातील विभागनिहाय अध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा करत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागास देण्याचा निर्णय घेतला. मार्चची वेतन बिले पूर्ण झाल्यामुळे हे एक दिवसाचे वेतन आयुक्तांनी एप्रिलमधील वेतनातून शासनाच्या विहित संगणकीय पद्धतीचा अवलंब करून मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता निधीत जमा करावे, असे या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, संघटनेच्या ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या सहाय्यता निधीकरिता पेन्शनमधून निधी जमा करावयाचा आहे त्याकरिताचे ऑनलाइन खाते तपशील संघटनेला द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रावर कार्यालयीन चिटणीस प्रदीप ढगे यांची सही आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT