Market Committee Election esakal
नाशिक

Market Committee Election : लासलगावला 13 अपक्षांचे आव्हान; 49 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीनंतर १८ जागांसाठी ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी दोन पॅनल तयार झाले असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर आणि गटाचे शेतकरी विकास पॅनल निवडणूक रिंगणात आहे.

शेतकरी पॅनलकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप आणि गट निवडणूक रिंगणात आहे. अनेक इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात हिरमोड पाहायला मिळाला. तर १३ उमेदवारांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उभे राहून दोन्ही पॅनलला आव्हान दिले आहे. (13 independents challenge Lasalgaon 49 candidates in Market Committee Election nashik news)

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, दोन वेळा सभापतीपद भूषवलेले जयदत्त होळकर, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात सोनिया होळकर तर थोरे गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,

लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप, इफकोच्या संचालिका साधना जाधव हे प्रमुख उमेदवार आहेत. यामुळे काट्याची लढत पाहायला मिळणार आहे. अपक्षांमध्ये विद्यमान सदस्य नंदकुमार डागा हेही निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

शेतकरी पॅनलचे उमेदवार

सोसायटी गट ः सुधाकर बाजीराव घोटेकर, शिवनाथ दत्तात्रय जाधव, दत्तात्रय तुकाराम डुकरे, राजेंद्र सदाशिव डोखळे, गणेश डोमाडे, भास्कररराव पानगव्हाने, रावसाहेब कारभारी रायते. इतर मागास वर्ग गट ः साधना लक्ष्मणराव जाधव, भटके विमुक्त प्रवर्ग ः सुभाष नामदेव कराड. महिला राखीव ः सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप, प्रिती नवनाथ बोरगुडे. ग्रामपंचायत गट ः ज्ञानेश्वर जगताप, पंढरीनाथ थोरे.

आर्थिक दुर्बल गट ः राजेंद्र रामनाथ बोरगुडे. अनुजाती जमाती गट ः महेश बबन पठाडे. व्यापारी गट ः बाळासाहेब किसन दराडे, विनय पुरुषोत्तम चोथणी. हमाल मापारी ः रमेश देवाजी पालवे.

शेतकरी विकासचे उमेदवार

सोसायटी गट : जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, हरिश्चंद्र भवर, ललित दरेकर, आशिष मोगल, भीमराज काळे, छबूराव जाधव. इतर मागास वर्ग ः डॉ. श्रीकांत आवारे. भटके विमुक्त प्रवर्ग ः तानाजी आंधळे. महिला राखीव गट ः सोनिया होळकर, शोभा सानप. ग्रामपंचायत गट ः गोपीनाथ ठुबे, दिलीप गायकवाड. आर्थिक दुर्बल गट ः शिवा सुरासे. अनुजाती जमाती ः अरुण डांगळे. व्यापारी गट ः सचिन ब्रम्हेचा आणि ज्ञानेश्वर गांगुर्डे. हमाल मापारी ः संजय वाकचौरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Women Joint Pain: महिलांना सतावतेय हिवाळ्यातील सांधेदुखी; योग्‍य तपासण्‍या, जीवनशैलीविषयक बदल करण्‍याचा तज्ज्ञांचा सल्‍ला

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवासबंदीचा बडगा; आणखी वीस देशांच्या अमेरिकावारीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT