Burglary esakal
नाशिक

Nashik : 13 लाखांची धाडसी घरफोडी; दागिने व रक्कम लंपास

अंबादास शिंदे

नाशिक रोड : नाशिक रोड व उपनगर परिसरात घरफोडीचे (Burglary) सत्र अद्यापही सुरूच असून उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जयभवानी रोड येथे बंगल्याच्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश करून तब्बल १३ लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने (Jewelry) तसेच रोख रक्कम सुमारे तीन लाख ४० हजार रुपये असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (13 lakh Jewelry and money stolen in burglary at Nashikroad Nashik Crime News)

आवटे मळा परिसरात सोहनलाल शर्मा यांचा बंगला आहे. बंगल्याच्या एका बाजूची खिडकी उघडी असताना या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या १८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बारा बांगड्या, ६४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ३६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन मंगळसूत्र, वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन पेंडल, बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉइन, आठ हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, एक लाख ८० हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे चांदीचे भांडे, १२ हजार रुपये किमतीचे चांदीचे कॉई, चांदीची चेन व तीन लाख ४० हजार रुपये रोख, असा १३ लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT