fraud esakal
नाशिक

सरकारी नोकरीचे आमिष पडले महागात; दोघांना बसला 13 लाखांचा गंडा

विनोद बेदरकर

नाशिक : प्रत्येक तरुणाला वाटत असते कि आपल्यालाही सरकारी नोकरी लागावी, म्हणजे आयुष्य कस सुखा-सुखी सुरू होत. जर केंद्र सरकारच्या आखत्यारित येणारी नोकरी लागली तर सोन्याहून पिवळं. त्यातही रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी तरूण धडपड करत असतात. मात्र ही धडपड करताना जर आपण एखाद्या आमिषाला बळी पडलो तर आपला खिसा रिकामा झालाच म्हणून समजायच. असाच अनुभव नाशिकच्या दोघा तरुणांना आला आहे.

त्यांनी भरती प्रक्रिया अशी राबली कि समोरच्याला वाटेल....

वैभव वाडकर आणि राहुल बालुरे असे या फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. सिडको परिसरात १ जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळात यांच्यासह काही तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटक व कोलकत्ता येथे बोलावून घेतले. त्यांच्‍याकडून खोटे फॉर्म भरून घेतले व खोटी भरती प्रक्रिया राबवून ती खरी आहे, असे भासवून यांच्याकडून नाशिक येथील ॲक्सिस बँकेचे धनादेश घेऊन १३ लाख वटवले. जेव्हा आपली फसवणूक झाली आहे असे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रकाश पाटील, संदीप उपासे, दयानंद उपासे (एकांबा, ता. औराद, जि. बिदर), निरंजन, मानसकुमार नाईक अशी संशयितांची नावे आहेत. वैभव शिवाजी वाडकर (वय २५, चंदा निवास, जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT