Teacher esakal
नाशिक

Nashik News : जिल्हातंर्गत शिक्षक पडताळणीमध्ये 13 शिक्षक अपात्र; हरकतींसाठी 3 पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतंर्गत शिक्षकांच्या मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, यात संवर्ग एकमधील नऊ, संवर्ग दोनमधील चार असे एकूण १३ शिक्षक अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करताना ते खासगी डॉक्टरांकडून घेण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक ते चार संवर्गपर्यंतच्या चार हजार ६२१ शिक्षकांची यादी ऑनलाइन प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर हरकत घेण्यासाठी शिक्षकांना ३ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. (13 teachers disqualified in district teacher verification 3 deadline for objections nashik Latest Marathi News)

जिल्हा परिषद शाळेतील एकाच शाळेत पाच वर्षे किंवा सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांमध्ये दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. यातील वेळापत्रकात सतत बदल होत आहेत. टप्पा-१ अंतर्गत दोन हजार १४० शिक्षकांनी अर्ज केला आहे. त्यातील ५१३ शिक्षकांनी बदली करण्यास होकार कळवला आहे. उर्वरित एक हजार ६३६ शिक्षकांनी बदली करण्यास नकार कळवला आहे. टप्पा-२ अंतर्गत २१३ शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. टप्पा-२ अंतर्गत पती-पत्नी एकत्रिकरण केले जाते.

त्यामुळे बदली अर्जासोबत शिक्षकांना पती व पत्नी या दोघांच्या शाळेतील अंतर ३० किलो मीटरपेक्षा जास्त आहे की नाही, याचा दाखला जोडावा लागतो. हा दाखला कार्यकारी अभियंत्यांकडून मिळवल्यानंतर शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

या पडताळणीनंतर संवर्ग एकमधील नऊ शिक्षक अपात्र ठरले. वैद्यकीय कारणांसाठी बदली मागितली असली तरी, प्रत्यक्षात वैद्यकीय कारण योग्य नाही, खासगी वैद्यकीय दवाखान्यातून वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे या कारणांनी हे शिक्षक अपात्र ठरले आहेत.

संवर्ग दोनमधील चार शिक्षक अपात्र ठरले. संवर्ग-१ व संवर्ग-२ यांच्यासह संवर्ग-३ अर्थात, बदली अधिकार प्राप्त ठरणाऱ्या एक हजार २९१ शिक्षकांची आणि संवर्ग-४ अंतर्गत बदलीस पात्र ठरणारे ९८२ शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली आहे.

संवर्गनिहाय अर्ज

वर्ग-१ अंतर्गत दोन हजार १४० शिक्षक, वर्ग-२ अंतर्गत २०९ शिक्षक, वर्ग-३ अंतर्गत एक हजार २९१ शिक्षक आणि वर्ग-४ अंतर्गत ९८२ शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT