Corona Updates Google
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात आज १३० पॉझिटिव्‍ह; चार बाधितांचा मृत्‍यू

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या सक्रिय (ॲक्‍टिव्‍ह) रुग्‍णांची संख्या पुन्‍हा एकदा स्‍थिरावली आहे. मंगळवारी (ता. २९) जिल्‍ह्यात १३० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर १७२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात दोन हजार ४६५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (130 new corona positive patients reported in nashik district)


मंगळवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रात ८६, नाशिक महापालिका क्षेत्रात ३९, मालेगाव महापालिका क्षेत्रात चार, तर जिल्‍हाबाहेरील एका रुग्‍णाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. जिल्‍ह्यात उपचारादरम्‍यान मृत्‍यू झालेल्‍या चार बाधितांपैकी प्रत्‍येकी दोन नाशिक महापालिका व नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. चारही मृत ज्‍येष्ठ नागरिक आहेत. शहरातील सातपूर येथील ७० वर्षीय, तर टागोरनगरमधील ८० वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमध्ये भाऊसाहेबनगर येथील ७३ वर्षीय, ममदापूर (ता. येवला) येथील ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.


सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार १४० अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक ५२९, मालेगाव क्षेत्रातील साडेतीनशे, नाशिक महापालिका क्षेत्रातील २६१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५६८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ५३७ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्णालयात एक रुग्‍ण दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT