Gallion variety of brinjal plants uprooted by farmer Sunil Gawli and thrown away. esakal
नाशिक

Brinjal Crop Crisis : वांग्याचे 15 गुठ्यातील पीक उपटले! उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश

सकाळ वृत्तसेवा

Brinjal Crop Crisis : गेल्या दोन महिन्यात गारपीट, अवकाळी पाऊस तसेच आता वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे भरितासाठी प्रसिद्ध असलेल्या गॅलियन जातीच्या वांग्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने उर्वरित वांग्याला ही मातीमोल, किलोला अवगा तीन रूपये बाजारभाव मिळत आहे.

यामुळे निराश झालेल्या शेतकरी सुनील गवळी यांनी पंधरा गुंठ्यांवरील वांग्याचे पीक उपटून फेकून दिले. ब्राह्मणगाव (विंचूर) येथे ही घटना घडली आहे. (15 bunches of brinjal crop demoished Farmers disappointed 3 rupees rate to brinjal nashik news)

लासलगावजवळील ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी गवळी यांनी लाल कांद्याचे पिक घेतले होते. त्यांना त्यातून मोठा तोटा झाल्याने शेतीत काही तरी वेगळा प्रयोग करावा म्हणून भरितासाठी प्रसिद्ध असलेल्या गॅलियन जातीच्या वांग्याचे पीक त्यांनी पंधरा गुंठ्यांवर घेण्याचे ठरविले.

त्यासाठी ड्रीप, रोप, खते, औषधे असा ५० ते ६० हजाराचा खर्च केला. पण मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकाला मोठा फटका बसला. खते, औषधाचा वापर करत यावर मात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पिकही जोमदार होते, उत्पादन सुरू झाले पण दर घसरले. एका क्रेट्स मध्ये १२ ते १३ किलो वांगे बसत असून तिला केवळ ४० रुपये इतका मातीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि शेतातून वांगे काढणीचा खर्चही निघणे मुश्किल झाले.

त्यात आता वाढलेला उन्हाचा तडाख्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक खराब होत असल्याने निराश होत त्यांनी वांग्याची रोपेचे उपटून फेकून दिली. त्यांचा वांग्याच्या शेतीचा वेगळा प्रयोगही फसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT