Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या 15 कोटींच्या रस्त्यांची लागली वाट! समृद्धी महामार्गाचा फटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे सिन्नर तालुक्यातील काम पूर्ण होऊन इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंत वाहतूकही सुरू झाली आहे.

मात्र, या दोन्ही तालुक्यांमध्ये समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज वाहतूक करताना या दोन्ही तालुक्यांमधील अनेक रस्ते नादुरुस्त होऊन तब्बल १५ कोटींचे नुकसान झाले.

या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असूनही त्यांच्याकडून याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने या दोन्ही तालुक्यांमधील जवळपास ६० गावांमधील नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. (15 crore roads of Zilla Parishad waiting Samriddhi Highway problem Nashik News)

जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधून हा महामार्ग जातो. सिन्नर तालुक्यातील काम पूर्ण झाले असून, इगतपुरी तालुक्यातील काही भागातील काम अंतिम टप्प्यात आहे.

सिन्नरचे काम पूर्ण झाल्याने लोकांची मागणी लक्षात घेऊन सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नादुरुस्त रस्त्यांबाबत अहवाल तयार केला.

यातील थोड्याफार रस्त्यांची दुरुस्ती झालीही. इतर रस्ते अद्यापही तसेच नादुरुस्त असताना संबंधित कंपनीने सर्व रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचा अहवाल दिला असल्याचे समजते.

या रस्त्यांबाबत इगतपुरीतही जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांनी नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र लिहिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण, शेणवड ते खडकवाडी या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी २०२१ मध्ये केली.

मात्र, याबाबत अद्याप काहीही कार्यवाही न केल्याने या भागातील नागरिकांना या खड्ड्यांच्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. सायाळे (ता. सिन्नर) येथे दोन महिन्यांपूर्वी नागरिकांनी या नादुरुस्त रस्त्यांबाबत आंदोलन केले होते.

सिन्नर तालुक्यात ५२ गावांमधील रस्त्यांचे या अवजड वाहनांमुळे १० कोटींचे नुकसान झाले असून, इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांचेही जवळपास पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये निधी लागेल.

जिल्हा नियोजन समिती, बांधकाम विभाग अथवा ग्रामविकास विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी तत्पर असलेले लोकप्रतिनिधी ‘समृद्धी’मुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांसाठी पाठपुरावा करण्याची मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT