Road construction
Road construction sakal
नाशिक

Nashik : रस्ते दुरुस्तीचा 15 दिवसांचा अल्टिमेटम हवेतच!

सकाळ वृत्तसेवा

* एकही ठेकेदाराला काळ्या यादीत नाही

* केवळ नोटीस देण्याचा सोपस्कार

* दीड महिना उलटून रस्त्यांची परिस्थिती जैसे थे

नाशिक : मागील दोन वर्षात साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने त्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांना तातडीने रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जे ठेकेदार दुरुस्ती करणार नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. परंतु, दीड महिना उलटून रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तर आहेच. उलट एकही ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकल्याने नोटीस देण्याचा सोपस्कार पार पाडल्याचे सोमवारी (ता. १४) दिसून आले. (15 days ultimatum for road repair not done yet nashik Latest Marathi News)

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची करण्याच्या उद्देशाने सोमवारी महापालिकेच्या अभियंत्यांसह ठेकेदारांची बैठक बोलविण्यात आली. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील उपस्थित होते. पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेकेदारांना नोटीस बजावून दोष निवारण कालावधीतील रस्ते दुरुस्त न झाल्यास काळा यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार बांधकाम विभागाकडून जवळपास १४ ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, बांधकाम विभागाने फक्त नोटीस देण्याचा सोपस्कार पार पाडला. नोटिशीमध्ये रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रस्ते तर दुरुस्त झाले नाही. सोमवारी पुन्हा बैठक घेत, पुन्हा सर्व मक्तेदारांना दोष निवारण कालावधीत रस्ते निविदा अटी- शर्तीनुसार गुणवत्ता पूर्ण काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यपाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त पश्चिम विभागातील मोडक पॉइंट सिग्नल चौकात डांबरीकरण करण्यात आले. याच विभागातील रविवार कारंजाजवळ अहिल्याबाई होळकर पुलाजवळ रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. सातपूर विभागातील प्रभाग ११ मध्ये एमआयडीसीमधील सिएट पुलावरील रस्ता दुरुस्तीचे काम करून रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सिडको विभागातील अंबड एमआयडीसीच्या मुंगी इंजिनिअरिंग कंपनीजवळील रस्ता दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आता नोव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम

बैठकीत पुन्हा नव्याने ठेकेदारांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत तसेच दोष निवारण कालावधीतील रस्ते दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी सर्व मक्तेदारांना लिखित यादीतून खड्डे बुजविण्याची यादी सादर करण्यात आली. कामाचे गुणवत्ता राखण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT