15 lakh new electricity meters from MSEDCL in nashik esakal
नाशिक

नाशिक : महावितरणकडून १५ लाख नवीन वीजमीटर

विनोद बेदरकर

नाशिक : महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या दिल्या जातात. नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा २ लाख मीटरची आवश्यकता भासते. सद्यस्थितीत २२ एप्रिलपर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ लाख ३१ हजार ८०२ मीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबर २०२२ पर्यंत तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे.

येत्या ३० एप्रिलपर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात ३ लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होत जाणार आहेत. याशिवाय दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १.५० लाख थ्रीफेज मिटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्रीफेज मिटरचा पुरवठा येत्या मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी २० लाख सिंगल फेज मिटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शिवाय मा. वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषीग्राहकांना प्रिपेड मिटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या कृषिग्राहकांना दिड लाख प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT