Crime esakal
नाशिक

Nashik Crime: सातपूरमधून 15 जण तडीपार; दोघांवर MPDA, 8 जणांना मोक्का

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील सातपूर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच सर्व सण-उत्सव शांततेत पार पडावे यासाठी सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली असून आठ महिन्यात १५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर चार जणांना दहा दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन जणांवर एमपीडीए तर ८ जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. (15 people wanted from Satpur MPDA on two Mokka on 8 Nashik Crime)

सातपूर परिसरात शांतता प्रस्थापित राहण्याबरोबरच नागरिकांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर परिसरात अशांतता पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १५ जणांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यात लक्ष्मण ऊर्फ बादशाह गुंबाडे (वय ३५, रा. पिंपळगाव बहुला), राहुल इंगळे (वय २९, रा. अशोकनगर), मुकेश मगर (वय २४, जाधव संकुल, अशोकनगर), कुणाल चव्हाण (वय २६, अशोक नगर ), निखिल पवार (वय २२, पिंपळगाव बाहुला), संतोष विठ्ठल पालवे (वय ३२, प्रबुद्धनगर सातपूर), आकाश भाऊसाहेब महाले (वय २१, वाढोली) यांचा समावेश आहे.

अक्षय पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एका जणांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

गोळीबार प्रकरणी ८ जणांना मोक्का

सातपूर एमआयडीसीत भरदिवसा तपन जाधव या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी आशिष जाधव, अक्षय भारती, गणेश जाधव, किरण चव्हाण, चेतन इंगळे, सोमनाथ ऊर्फ सनी झांजर, भूषण पवार, रोहित अहिरराव या ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT