NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News : गाळ्यांच्या भाडे दरात व्यावसायिकांना 15 टक्के दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लायसन्स फी मध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी व रोजगार हमी कर घरपट्टीत समाविष्ट करण्यात आल्याने महापालिकेमार्फत वाटप करण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांचे भाडे परवडत नसल्याची तक्रार करणाऱ्या व्यावसायिकांना जवळपास पंधरा टक्के भाडे दरात दिलासा मिळणार आहे. (15 percent relief for businessmen in rental rate of carpets NMC News)

शहरात महापालिकेच्या मालकीचे ६२ व्यापारी संकुल असून यात २०९३ गाळे आहेत. उच्च न्यायालयातील एका याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाने महापालिकेमार्फत दिलेल्या गाळ्यांच्या दरात वाढ केली आहे.

यात रेडीरेकनरच्या आठ टक्के किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केलेला दर या दोन पैकी जो अधिक दर असेल त्यातील दर गाड्यांना लागू करावा अशा सूचना आहे.

राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत त्या अनुषंगाने महापालिकेला भाडे कर आकारणी करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, बाजारभावापेक्षा महापालिकेच्या गाळ्यांचे अधिक दर असल्याने अनेकांनी महापालिकेचे गाळे ताब्यात दिले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दर कमी करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी एक एप्रिल २०२३ पासून जागा लायसन्स फी मध्ये समाविष्ट असलेल्या रोजगार हमी कर व शिक्षण कराचा समावेश घरपट्टीत केला आहे.

शिक्षण कराचे १२ टक्के तर रोजगार हमी कराचे तीन टक्के अशी पंधरा टक्के रक्कम लायसन्स फी मधून रद्द करण्यात आल्याने गाळे भाडे धारकांना भाडेदरात दिलासा मिळणार आहे. -- १३२ गाळ्यांना सील एकीकडे भाडेकरूंना दिलासा देताना थकबाकीदारांवर देखील महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. एक हजार २०२ थकबाकीदारांकडून ४२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. थकबाकीदार असलेले १३२ गाळे सील करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT