marriage registration
marriage registration esakal
नाशिक

Marriage Registration: पूर्व विभागीय कार्यालयात 5 महिन्यांत 153 विवाह नोंदणी; महापालिकाची तिजोरीत होतेय वाढ!

सकाळ वृत्तसेवा

Marriage Registration : महापालिका पूर्व विभागीय कार्यालयात विवाह नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. यंदा केवळ पाचच महिन्यात १५३ विवाह नोंदणी झाली आहे. गत वर्षी संपूर्ण वर्षभरात ३४९ विवाह नोंदणी झाली होती.

या दोन्ही आकडेवारीचा विचार केला तर आगामी महिन्यात होणारी नोंदणी दोनशेचा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (153 marriage registrations in 5 months in Eastern Divisional Office nmc nashik news)

महापालिका विभागीय कार्यालयामध्ये विवाह नोंदणीमुळे महापालिकेच्या तिजोरीतही भर पडत आहे. शाळा, विविध शासकीय कार्यालय, पासपोर्ट कार्यालय याशिवाय बहुतांशी ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे.

त्यानिमित्ताने नागरिकांचा विवाह नोंदणीकडे कल वाढला आहे. या वाढत्या विवाह नोंदणीमुळे महापालिकेच्या तिजोरीतही चांगली भर पडत आहे. सध्या विवाह नोंदणी करताना संबंधित व्यक्तींकडून घरपट्टी आणि पाणीपट्टीचा भरणा केला आहे किंवा नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बिलापोटी थकबाकी तर नाही ना. याची तपासणी केली जात आहे. थकबाकी नसणाऱ्यांना कुठलीही अडचण येत नाही. थकबाकी असणाऱ्यांना मात्र थकीत बिलांचा भरणा केल्याशिवाय त्यांची विवाह नोंदणी होत नाही.

इतर कागदपत्रांप्रमाणे थकबाकी नसल्याचा पुरावा देखील विवाह नोंदणीच्या प्रस्तावाबरोबर जोडला जात आहे. त्यामुळे बिल भरणा अनिवार्य झाले आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीसह महसुलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT