JCB's assistance was taken to drain the standing water on the road esakal
नाशिक

Nashik Rain Update: एकाच दिवसात कोसळले 16 वृक्ष! शहराच्या विविध भागात पाणी साचले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : गोपाळकाल्याने पावसाची दहीहंडी फुटली. शुक्रवार (ता. ८) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.

दिवसभर झालेल्या पावसाने शहराच्या विविध भागात पाणी साठणे, वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. एकच दिवसात वृक्ष कोसळण्याच्या १६ घटना घडल्या.(16 trees fell in single day Water accumulated in various parts of city Nashik Rain Update)

काही भागात जोरदार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सरस्वती नाला, दहिपूल तसेच दिंडोरी नाका, पंचवटी पोलिस ठाणे समोरील मार्ग, सातपूर रोडवर महिंद्रा सर्कल येथे रस्त्यावर पाणी साचले होते.

खडकळी येथील रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या दुभाजकाच्या खड्ड्यांमध्ये तसेच दूध बाजारासह शहराच्या विविध भागात रस्त्याच्या बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील कच, मुरूम वाहून गेल्याने खड्डे उघडे पडून मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

दुसरीकडे गंगापूर रोड, सातपूर, कॉलेज रोड, पंचवटी अशा अनेक भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी एका दिवसात १६ वृक्ष कोसळले. सातपूर येथील एका दुचाकीवर वृक्ष कोसळल्याने नुकसान झाले.

वृक्ष कोसळण्याच्या सर्वाधिक घटना सातपूर येथे घडल्या. येथे तब्बल आठ वृक्ष कोसळले, तर सर्वात कमी पंचवटी येथे एक वृक्ष कोसळला. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

अग्निशामक विभागाने वेळीच घटनास्थळी दाखल होत रस्त्यावरील वृक्ष कापून रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. याच दरम्यान मुंबई-आग्रा महामार्ग पंचवटी महाविद्यालय समोर वाहने घसरत असल्याने अग्निशामक विभागाकडून पाणी मारून रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मांजात अडकलेल्या पक्ष्याची सुटका करण्यात आली. याशिवाय विविध लहान मोठ्या घटनांचे कॉल अग्निशामक विभागात येत असल्याने २४ तास विभागाचा दूरध्वनी खणखणत राहिला. दिंडोरी नाका येथील साचलेले पाणी प्रवाहित करण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

तर सरस्वती नाला, दहिफुल यास विविध भागातील रस्त्यावरील साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटावरील चेंबरचे ढापे जाळ्या उघड्या करून देण्यात आल्या. खड्ड्यांमध्ये मात्र पाणी साचून होते.

वृक्ष कोसळण्याच्या घटना

ठिकाण घटना

सातपूर केंद्र ८

नाशिक रोड ३

सिडको २

पंचवटी १

मुख्यालय २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT