Onion esakal
नाशिक

Onion Rate Hike: लासलगावमध्ये लाल कांदा भावात 1600 रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

Onion Rate Hike : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपोत्सवाच्या बारा दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (ता. २०) लाल कांद्याच्या भावात सरासरी सोळाशे रुपयांची वाढ झाली. मात्र त्याचवेळी उन्हाळ कांद्याच्या भावात सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.

उन्हाळ कांद्याला कमाल चार हजार ५४५ रुपये क्विंटल, असा भाव मिळाला. लाल कांद्याचा भाव क्विंटलला चार हजार १०१ रुपये असा राहिला. (1600 rupees increase in red onion price in Lasalgaon nashik news)

जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन दीपोत्सवात कांदा विक्रीस अडचण झाली. सणासुदीत पैशांची गरज असताना लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.

६ नोव्हेंबरला लासलगाव बाजार समितीत लिलाव झाले असताना उन्हाळ कांद्याला कमाल चार हजार रुपये, तर लाल कांद्याला कमाल तीन हजार ५०१ रुपये क्विंटल, असा भाव मिळाला होता. ६ नोव्हेंबरच्या तुलनेत कांदा कमाल दरात ५०० ते ६०० रुपयांची तेजी दिसून आली.

दरम्यान, सोमवारी सकाळी साडेनऊला लाल कांद्याची नवीन आवक वाढल्याने कांद्याचे पूजन कांदा व्यापारी वृषभ राका, बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे व दत्तात्रय खाडे व संदीप गोमासे यांच्या हस्ते करण्यात आले.

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला रुपयांमध्ये)

(दहा हजार ९८८ क्विंटल आवक)

- उन्हाळ : किमान- एक हजार ५११, कमाल- चार हजार ५४५, सरासरी- चार हजार

- लाल : किमान- दोन हजार, कमाल- चार हजार १०१, सरासरी- तीन हजार ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT